पटना -एनआईए न्यायालयाने (NIA Court) 8 वर्षानंतर गांधी मैदान बॉमस्फोट प्रकरणात एक ऐतिहासिक निकाल दिला आहे. या प्रकरणातील 9 आरोपींना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. त्यामध्ये 4 जणांना फाशीची शिक्षा त दोन जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर दोन जणांना 10 वर्षांच्या कारवासाची शिक्षा सुनावली आहे. आणि एकाला 7 वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
गांधी मैदान बॉम्बस्फोट प्रकरणात 4 जणांना फाशीची शिक्षा, दोन जणांना जन्मठेप 2013 मध्ये झाला होती घटना -
27 ऑक्टोबर 2013 रोजी फक्त 12 मिनिटात 6 धमाके झाले होते. त्यामुळे सर्वत्र गोंधळ उडून लोकांची पळापळ सुरू होती. यामध्ये काही लोकांचा मृत्यू झाला होता तर काही जण गंभीर जखमी झाले होते. बॉम्बस्फोटाच्या नंतर हवेत त्याठिकाणावरून मोठ्या प्रमाणात दुराचे लोट निघत होते.
यांना झाली शिक्षा -
गांधी मैदानात भर सभेत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात NIA न्यायालयाचे विशेष न्यायाधीश गुरविंदर सिंह मलहोत्रा यांनी हैदर अली, नोमान अंसारी, मो. मुजिबुल्लाह अंसारी, इम्तियाज आलम यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर उमर सिद्दीकी आणि अजहरुद्दीन कुरैशी यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अहमद हुसैनस आणि मो. फिरोज असलम यांना 10 वर्ष आणि इफ्तिखार आलम याला 7 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तर पुरव्याच्या अभावामुळे फकरूद्दीन याला सोडण्यात आले आहे.
विशेष पब्लिक प्रोसेक्यूटर लल्लन प्रसाद सिन्हा यांची प्रतिक्रिया, म्हणाले -
एनआईए न्यायालयाचे विशेष पब्लिक प्रोसेक्यूटर लल्लन प्रसाद सिन्हा यांनी सांगितले की, न्यायालयाने न्यायालयात सादर झालेल्या पुरावे, फॉरेंसिक लेबोरेटरीचा अहवाल याच्या आधारावर आणि दोन्ही पक्षाच्या युक्तीवाद ऐकून आपला निर्णय दिला. हे प्रकरण खूप गंभीर आणि संवेदनशील होते. 5 लोक मारल्या गेले होते. आणि 89 जण हे गंभीर जखमी झाले होते. या सगळ्या बाबीला ध्यानात ठेऊन न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे.
हेही वाचा -ड्रग्स पुरवठा केल्याचा व्हाट्सअप चॅट पुरावा होऊ शकत नाही - विशेष न्यायालय