नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला आज चार वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त राज्यात सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2017 मध्ये पार पडली होती. या निवडणुकीत भाजपाला अभुतपूर्व यश मिळाले होते. सपा-काँग्रेस आघाडी तसेच बसपा ह्या प्रमुख पक्षांना दारूण अपयशाचा सामना करावा लागला होता.
उत्तर प्रदेश सरकारला चार वर्ष पूर्ण - completed 4 years of yogi government
उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला आज चार वर्ष पूर्ण झाली आहेत. भाजपाच्या विधिमंडळ बैठकीदरम्यान गोरखपूर मठाचे पुजारी व विद्यमान लोकसभा सदस्य योगी आदित्यनाथ ह्यांची मुख्यमंत्रीपदावर निवड करण्यात आली व 19मार्च 2017 रोजी त्यांनी पदाची शपथ घेतली.
उत्तर प्रदेश सरकारला चार वर्ष पूर्ण
भाजपाच्या विधिमंडळ बैठकीदरम्यान गोरखपूर मठाचे पुजारी व विद्यमान लोकसभा सदस्य योगी आदित्यनाथ ह्यांची मुख्यमंत्रीपदावर निवड करण्यात आली व 19 मार्च 2017 रोजी त्यांनी पदाची शपथ घेतली. या चार वर्षांच्या कालावधीत राज्य सरकारनं केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप कार्यकर्ते मोहीम राबवणार आहेत.