महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पत्रकार मोहम्मद जुबैरला पोलिस कोठडी, पटियाला कोर्टात हजेरी - Alt news चे संस्थापक मोहम्मद जुबैर

दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने पत्रकार आणि वेबसाइट Alt न्यूजचे संस्थापक मोहम्मद जुबेर यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. मोहम्मद जुबेरवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. आज कोर्टात हजर करण्यात आले आहे.

पत्रकार मोहम्मद जुबैरला पोलिस कोठडी आज कोर्टात हजर करणार
पत्रकार मोहम्मद जुबैरला पोलिस कोठडी आज कोर्टात हजर करणार

By

Published : Jun 28, 2022, 9:47 AM IST

Updated : Jun 28, 2022, 4:27 PM IST

नवी दिल्ली:दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने पत्रकार आणि तथ्य तपासणाऱ्या वेबसाइट ऑल्ट न्यूजचे संस्थापक मोहम्मद जुबेर यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. मोहम्मद जुबेरवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुबेरला २७ जून रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली. चौकशीनंतर 27 जूनच्या संध्याकाळी जुबेरला अटक करण्यात आली. त्यानंतर रात्रीच बुरारी येथील निवासस्थानी ड्युटी मॅजिस्ट्रेटसमोर हजर करण्यात आले.

हजेरी दरम्यान, जुबेरची बाजू मांडणारे वकील सौतिक बॅनर्जी आणि कंवलप्रीत कौर यांनी जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने जुबेरला त्याच्या पोलीस कोठडीत अर्धा तास त्याच्या वकिलाशी बोलण्याची परवानगी दिली. पत्रकार मोहम्मद जुबेरला २८ जून रोजी संबंधित दंडाधिकार्‍यांसमोर हजर करण्याचे आदेश सदर दंडाधिकार्‍यांनी दिल्ली पोलिसांना दिले. त्यामुळे आज त्याची हजेरी आहे. पटियाला कोर्टात दुपारी हजर करण्यात आले आहे. सुनावणीनीनंतर कोर्ट याबाबत निर्णय देईल.

हेही वाचा - Assam Flood : आसाममध्ये पुराने हाहाकार.. ३५ पैकी २२ जिल्हे प्रभावित.. २२५४ गावांना पुराच्या पाण्याने वेढले

Last Updated : Jun 28, 2022, 4:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details