नवी दिल्ली -विरोधी पक्षाच्या प्रतिनिधी मंडळाने आज (बुधवारी) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीचे नेत शरद पवार, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव डी राजा, सीपीएम पक्षाचे नेते सिताराम येचुरी यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. कृषी कायदे रद्द करण्याचे निर्देश राष्ट्रपतींनी सरकारला द्यावे, अशी विनंती सर्व नेत्यांनी राष्ट्रपतींकडे केली.
राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर या नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधून माहिती दिली. आम्ही राष्ट्रपतींनी प्रस्ताव दिला. कृषी कायदे आणि वीज दुरुस्ती विधेयक रद्द करावेत, अशी मागणी आम्ही केली आहे. हे कायदे लोकशाही विरोधी असून शेतकऱ्यांशी चर्चा न करता मंजूर करण्यात आले आहेत, असे सीपीएम पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.