महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

JK Kupwara Encounter : कुपवाडामध्ये पाच विदेशी दहशतवाद्यांना धाडले यमसदनी; लष्करी जवानांकडून शोधमोहीम सुरूच

जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात भारतीय लष्करी जवानांना यश आले. या दहशतवाद्यांची ओळख अद्यापही पटली नसली, तरी हे पाचही विदेशी दहशतवादी असल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिली आहे.

JK Kupwara Encounter
संग्रहित छायाचित्र

By

Published : Jun 16, 2023, 12:13 PM IST

श्रीनगर :जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक सुरू झाली. यावेळी पाच विदेशी दहशतवाद्यांना भारतीय लष्करी जवानांनी यमसदनी धाडले. मात्र या दहशतवाद्यांची अद्यापही ओळख पटलेली नाही. परिसरात सुरक्षा दलांची शोधमोहीम सुरू आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी चकमकीच्या ठिकाणाहून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. सध्या चकमक सुरू असल्याची माहिती काश्मीर झोन पोलिसांनी ट्विट करून दिली आहे.

दहशतवाद्यांनी केला जवानांवर गोळीबार :काश्मीरचे एडीजीपी विजय कुमार यांनी कुपवाडा चकमकीत पाच विदेशी दहशतवादी मारले गेल्याची माहिती दिली आहेत. सुरक्षा दलांना कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेच्या जुमागुंड भागात दहशतवादी लपल्याची गुप्तचर विभागाकडून माहिती मिळाली होती. यानंतर सुरक्षा दल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे परिसराला वेढा घालून शोध मोहीम सुरू केली. तेव्हा सुरक्षा दल शोधमोहिम राबवत असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले. यादरम्यान दोन्ही बाजूंमध्ये चकमक सुरू झाली. यावेळी पाच विदेशी दहशतवादी मारले गेले आहेत.

कुपवाडा जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा :याआधी १३ जून रोजी कुपवाडा जिल्ह्यातील सीमावर्ती भागात लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. काल रात्री सुरक्षा दलांनी पूंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांची घुसखोरी हाणून पाडली आहे. घुसखोरीच्या प्रयत्नादरम्यान लष्कराने झटपट कारवाई केल्याने दहशतवादी घाबरून पळून गेले. झडतीदरम्यान दहशतवाद्यांनी मागे ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळावरून नऊ मॅगझिन, एक एके-74 रायफल, चार मॅगझिनसह दोन पिस्तूल आणि साठ राऊंड, सहा हातबॉम्ब, दोन पाऊच आणि दोन बॅग जप्त करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा -

  1. Jammu Kashmir : पूंछमध्ये घुसखोरीचा प्रयत्न फसला; भारतीय लष्कराने मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा केला जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details