मथुरा (उत्तर प्रदेश) Jitendra Awhad Controversial Statement : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावरुन सध्या वाद सुरु झालाय. यावर त्यांनी स्पष्टीकरणही दिलंय. तरी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. अशातच वृंदावन येथील गौरी गोपाल आश्रमात कथाकार अनिरुद्धाचार्य महाराज यांनीही जितेंद्र आव्हाडांवर टीका केलाय. त्यांनी याविषयी ईटीव्ही भारतशी खास संवाद साधला.
आमदारांना धर्मग्रंथांचं ज्ञान नाही :कथाकार अनिरुद्धाचार्य महाराज म्हणाले की, श्रीराम त्यांच्या घरी स्थायिक होत आहेत. देशातील प्रत्येक रामभक्ताचं यात योगदान आहे. हे मंदिर पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात बांधलं जातंय. त्यांच्या कार्यकाळात भव्य राम मंदिराचा पाया रचला गेला. अशातच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भगवान राम हे मांसाहारी असल्याचं वर्णन केल्यावर कथाकार अनिरुद्धाचार्य महाराज म्हणाले की, "या आमदाराला धर्मग्रंथांचं ज्ञान नाही. संस्कृतमध्ये मानसम म्हणजे फळाचा लगदा. हा शब्द फळासाठी वापरला जातो. नेताजींनी संस्कृत वाचलं नसेल. त्यामुळं त्यांनी चुकीचा अर्थ लावला. लोकांना धर्मग्रंथांचे योग्य ज्ञान नसेल तर ते त्यांचा चुकीचा अर्थ लावतात. त्यामुळं धर्मग्रंथांचं वाचन करणं अत्यंत आवश्यक आहे."