दीपावलीच्या दिवशी लक्ष्मी देवीची विशेष पूजा असते, देवीची आशीर्वाद मिळविण्यासाठी या खास वास्तु (JHADOO VASTU TIPS FOR DIWALI 2022) टिप्स पाळा. घरात असलेले तुटलेले झाडू लगेच घराबाहेर काढा. कारण वास्तूनुसार तुटलेले, जुन्या झाडूने घरात नकारात्मकता येते. यासोबतच घरातील अडचणी वाढतात. जुना झाडू फेकायचा असेल तर त्यासाठी शनिवार, अमावस्या किंवा ग्रहणानंतरची (BUY NEW BROOM ON DHANTERAS 2022) वेळ निवडावी. वास्तूनुसार शनिवारी किंवा अमावास्येला झाडू फेकणे (WHERE SHOULD YOU THROW OLD BROOM) सर्वात योग्य मानले जाते. जर तुम्हीही या दिवसात घरातून जुना किंवा तुटलेला झाडू बाहेर काढला तर, तुमच्या घरातील नकारात्मक शक्तीही झाडूसोबत घरातून बाहेर पडतात. तसेच घरामध्ये सकारात्मकता असते.Lakshmi Pujan . Dhantrayodashi
कोणत्या दिवशी झाडू टाकू नये आणि झाडू कुठे टाकावा :झाडू फेकताना कोणाच्याही पायाला हात लावू नये हे लक्षात ठेवा. कारण त्यात लक्ष्मीचा वास असतो. तसेच, कोणत्याही नाल्या आणि झाडाजवळ ठेवणे आणि फेकणे टाळा. हे देखील लक्षात ठेवा की, झाडू कधीही जाळू नका. झाडू फेकण्यासाठी एकादशी, गुरुवार किंवा शुक्रवार कधीही निवडू नये. असे मानले जाते की, गुरुवार आणि शुक्रवार हे देवी लक्ष्मीचे दिवस आहेत, म्हणून या दिवशी झाडू फेकण्यास मनाई आहे.