नवी दिल्ली :अभियांत्रिकी प्रवेशासाठी जेईई मेन 2023मध्ये परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक अलर्ट आहे. जेईई मेन 2023 सत्र 1चा निकाल लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने संयुक्त प्रवेश परीक्षा (मुख्य) 2023 च्या पहिल्या सत्रासाठी अंतिम उत्तरपत्रिका प्रसिद्ध केली आहे. याआधी प्रोव्हिजनल उत्तरपत्रिका जाहीर करण्यात आली होती.जेईई मेन जानेवारी 2023 अंतिम उत्तरपत्रिका5 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झाली. ते डाउनलोड करण्यासाठी, jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. NTA ने अद्याप जानेवारीच्या सत्राचे निकाल जाहीर करण्याच्या कोणत्याही तारखेची अधिकृत पुष्टी केलेली नाही. याबाबत लवकरच उमेदवारांना माहिती दिली जाईल.
निकाल तपासण्यासाठी उत्तरपत्रिका प्रसिद्ध :जेईई मेन्स परिक्षेच्या पहिल्या सत्राची उत्तरपत्रिका प्रसिद्ध झाली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) जानेवारीत झालेल्या या परिक्षेची उत्तरपत्रिका आपली अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर प्रसिद्ध केली आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार या पोर्टलला भेट देऊन ही उत्तरपत्रिका डाउनलोड करू शकतात. जेईई मेन्स परीक्षा 24 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2023 या दरम्यान घेण्यात आली होती. आता या परिक्षेचा निकाल तपासण्यासाठी उत्तरपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांचे निकाल अधिकृत वेबसाइटवर तपासले जाऊ शकतात.