महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

JEE Mains Answer Key : जेईई मेन्सच्या पहिल्या सत्राची उत्तर पत्रिका जारी, येथे करा चेक

जेईई मेन्स परीक्षा 24 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2023 या दरम्यान घेण्यात आली होती. आता या परिक्षेचा निकाल तपासण्यासाठी उत्तर पत्रिका जारी करण्यात आली आहे.

JEE Mains
जेईई मेन्स

By

Published : Feb 4, 2023, 9:31 AM IST

मुंबई : जेईई मेन्स परिक्षेच्या पहिल्या सत्राची उत्तर पत्रिका जारी झाली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) जानेवारीत झालेल्या या परिक्षेची उत्तर पत्रिका आपली अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जारी केली आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार या पोर्टलला भेट देऊन ही उत्तर पत्रिका डाउनलोड करू शकतात.

24 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान झाली परीक्षा : जेईई मेन्स परीक्षा 24 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2023 या दरम्यान घेण्यात आली होती. आता या परिक्षेचा निकाल तपासण्यासाठी उत्तर पत्रिका जारी करण्यात आली आहे. उत्तर पत्रिकेवरील हरकती एकत्र करून अंतिम उत्तर पत्रिका लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतरच निकाल जाहीर केला जाईल. उमेदवारांचे निकाल अधिकृत वेबसाइटवर तपासले जाऊ शकतात.

उत्तर पत्रिकेवर ४ फेब्रुवारीपर्यंत हरकती नोंदवा :उत्तर पत्रिकेत उत्तर तपासल्यानंतर कोणत्याही उमेदवाराला त्याच्या उत्तराची तपासणी योग्य प्रकारे झाली नाही असे वाटल्यास ते त्यावर आक्षेप नोंदवू शकतात. यासाठी उमेदवारांना 4 फेब्रुवारी 2023 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या दरम्यान उमेदवारांना अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जाऊन आक्षेप नोंदवावे लागतील. शेवटच्या तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही.

परिक्षेचे दुसरे सत्र एप्रिलमध्ये : यावर्षी एनटीएने घोषित केले आहे की जेईई मेन्स प्रवेश परीक्षा दोन सत्रांमध्ये घेतली जाईल. या अंतर्गत पहिले सत्र जानेवारीत पूर्ण झाले आहे. आता जेईई मेन्सच्या दुसऱ्या सत्राची नोंदणी jeemain.nta.nic.in या वेबसाइट वर सुरू होईल. दुसऱ्या सत्राची परिक्षा 6 ते 12 एप्रिल दरम्यान घेतली जाणार आहे.

पुन्हा 75 टक्के गुणांची सक्ती : दरवर्षी एनटीए आयआयटी आणि एनआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी जेईई मेन्स परीक्षा घेते. आता यंदाच्या जेईई परिक्षेत पुन्हा एकदा 12 वीमध्ये 75 टक्के गुणांची सक्ती लागू करण्यात आली आहे. मागील ३ वर्षांपासून कोविड-१९ मुळे हा पात्रता नियम काढून टाकण्यात आला होता. या नियमा अंतर्गत 12 वीत सामान्य, EWS आणि OBC साठी 75 टक्के गुण आणि SC-ST साठी 65 टक्के गुणांची पात्रता लागू होती. या परिक्षेला दरवर्षी सुमारे 10 लाख विद्यार्थी बसतात.

हेही वाचा :Paper Leak : परीक्षेआधीच गुजरात कनिष्ठ लिपिक पेपर लीक, विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

ABOUT THE AUTHOR

...view details