कोटा (राजस्थान) : जेईई मेन परिक्षेच्या जानेवारी सत्राचा निकाल आज जाहीर झाला. या परिक्षेत चंद्रपूरचा ज्ञानेश शिंदे 100 पर्सेंटाइल घेऊन देशात प्रथम आला आहे. तो राजस्थाच्या कोटा येथे राहून परिक्षेसाठी कोचिंग घेत होता. ईटीव्ही भारतने ज्ञानेश आणि त्याची आई माधवी यांची खास मुलाखत घेतली आहे. ज्ञानेशने लहानपणापासून अँड्रॉईड फोन वापरला नसून त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे इंटरनेट कनेक्शन नाही आहे. जेव्हा त्याचे अभ्यासातून लक्ष विचलित व्हायचे तेव्हा तो एकाग्रता वाढवण्यासाठी गिटार किंवा कीबोर्डवर संगीत वाजवायचा.
आठवी पासून आयआयटीचे स्वप्न : ज्ञानेश शिंदेने सांगितले की, त्याने आठवीतच आयआयटी बॉम्बेमधून कॉम्प्युटर सायन्स शाखेतून बीटेक करायचे ठरवले होते. याच उद्देशाने तो कोटा येथे आला होता. कोटाचे कौतुक करताना तो म्हणाला की, येथील वातावरण चांगले आहे. याला शिक्षणाचे शहर म्हटले जाते. येथे देशभरातून मोठ्या संख्येने मुले येतात. आयआयटी बॉम्बेमध्ये गेल्यानंतर मला तिथे शिक्षण घ्यायचे आहे आणि सॉफ्टवेअर इंजिनीअर होण्याचे ध्येय आहे. मात्र, यासाठी आगामी अॅडव्हांस परीक्षेत चांगली कामगिरी करावी लागणार आहे. सॉफ्टवेअर इंजिनीअर झाल्यानंतर परदेशात जायला आवडेल का, असे विचारले असता तो म्हणाले, मला मिळणाऱ्या संधींवर ते अवलंबून असेल. आता बाहेर जाण्याचे कोणतेही ध्येय नाही. माल देशात राहूनच सेवा करायची आहे.
कोटाच्या वातावरणाचा फायदा : कोटाच्या कोचिंग इन्स्टिट्यूटने त्याला खूप मदत केल्याचे ज्ञानेश म्हणाला. येथील प्राध्यापकांनी सर्व शंकांचे निरसन केले. अभ्यासाचे साहित्यही असे आहे की मी घरी जाऊन सर्व संकल्पना क्लिअर करू शकतो. माझ्याकडे जो काही गृहपाठ होता, तो मी गांभीर्याने पूर्ण केला. मी मेहनत करत राहिलो, आज त्याचे फळ मला मिळाले आहे. लहानपणापासूनच मला अभ्यासाची आवड होती, असेही तो म्हणाले. माझी आई लहानपणापासूनच माझी शिक्षिका होती आणि तिने मला खूप काही शिकवले आहे. माझा विश्वास आहे की पाया चांगला असला तर संकल्पना स्पष्ट होतात. कोटा येथील स्पर्धा अतिशय खडतर आहे. येथील टॉपर्समध्ये स्पर्धा आहे. एकही नंबर कापला तर तुमची रँक खूप मागे जाते. विद्यार्थ्याने 100 पर्सेंटाइल आणि काम करण्याचे ध्येय ठेवले पाहिजे.
दबाव न घेता सुधारणेवर काम केले पाहिजे : ज्ञानेश याने अभ्यासात मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांना टिप्स देताना सांगितले की, त्यांनी वर्गात केलेल्या अभ्यासाची योग्य उजळणी करावी. अभ्यासात जे समाविष्ट आहे ते पूर्ण करा. कोचिंग इन्स्टिट्यूटने आपल्या साहित्याची रचना अशा प्रकारे केली आहे की मुलांच्या सर्व संकल्पना स्पष्ट होतात. त्यांनी प्रश्न तयार करण्याचा सरावही केला पाहिजे. यातून ज्ञान वाढते. कधीकधी असे होते की परीक्षेचा निकाल खराब लागतो. मात्र तुम्ही तुमच्या सुधारणेवर काम केले पाहिजे. यामुळे मानसिकता चांगली राहते आणि तुम्ही चांगली कामगिरी करू शकता.