महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जेईईचा निकाल जाहीर, टॉप रँकिंगमधील 18 विद्यार्थ्यांमध्ये मुंबईतील सिंद्धातचाही समावेश

देशातील सर्वात मोठी अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जेईई मेन 2021 च्या चौथ्या टप्प्याच्या निकालाची लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालक वाट पाहत होते. मंगळवारी तो निकाल जाहीर झाला. यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या 18 विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्यो कोटा येथील कोचिगं क्लालेसमधून शिकवणी घेणाऱ्या सिद्धांत मुखर्जी आणि अंशुल वर्मा या दोघांचाही समावेश आहे.

जेईईचा निकाल जाहीर
जेईईचा निकाल जाहीर

By

Published : Sep 15, 2021, 9:24 AM IST

नवी दिल्ली/कोटा - जेईई-मेन, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेचा निकाल मंगळवारी रात्री जाहीर झाला. ज्यामध्ये एकूण 44 उमेदवारांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. तर 18 विद्यार्थ्यांना टॉप रँक मिळाला आहे. प्रथम क्रमांक मिळवणाऱ्यांमध्ये राजस्थानमधील तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या तीन विद्यार्थ्यांमध्ये मुंबईचा रहिवासी सिद्धांत मुखर्जी यांचे नाव आहे. तो कोटा येथील एका खासगी कोचिंग इन्स्टिट्यूटमधून तयारी करत होता. शिक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री ही माहिती दिली.

या वर्षापासून, संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) -वर्षातून चार वेळा घेतली जात आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांमध्ये सुधारणा करण्याची संधी देण्यासाठी या पद्धतीचा अवलंब केला जात आहे. यातील पहिला टप्पा फेब्रुवारी आणि दुसरा मार्चमध्ये पार पडला आहे. तर पुढील टप्प्यातील परीक्षा एप्रिल आणि मे मध्ये होणार होत्या, परंतु देशातील कोविड -19 साथीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर त्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. त्यानंतर तिसरा टप्पा 20-25 जुलै दरम्यान तर चौथा टप्पा 26 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान घेण्यात आला.

देशातील सर्वात मोठी अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जेईई मेन 2021 च्या चौथ्या टप्प्याच्या निकालाची लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालक वाट पाहत होते. मंगळवारी तो निकाल जाहीर झाला. यामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या 18 विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्यो कोटा येथील कोचिगं क्लालेसमधून शिकवणी घेणाऱ्या सिद्धांत मुखर्जी आणि अंशुल वर्मा या दोघांचाही समावेश आहे. या दोघांनीही जेईई मेनच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात अव्वल स्थान मिळवले आहे.

कोटोमधून जेईईची तयारी करून टॉप रँकच्या यादीत नाव पटकवणारा सिद्धार्थ मुखर्जी हा मुंबईचा रहिवासी आहे. सिद्धांतने कोटा येथील एका खासगी कोचिंग इन्स्टिट्यूटमधून शिकवणी लावली होती. सिद्धार्थने फेब्रुवारी 2021 च्या जेईई मुख्य सत्रात 300 पैकी 300 गुण पटकावले होते. तर कोटा येथील कोचिंग क्लासेसचा दुसरा विद्यार्थी अंशुल वर्मा याने देखील या परीक्षेत 100 टक्के गुण प्राप्त केले आहेत.

हेही वाचा - जेईई मुख्य परिक्षेतील गैरप्रकारात नागपूर कनेक्शन? शहरातील कोचिंग क्लासेसवर सीबीआयचा छापा

हेही वाचा -एनईईटी, जेईई, सीईटी सारख्या प्रवेश परीक्षांपासून ग्रामीण विद्यार्थी वंचित

ABOUT THE AUTHOR

...view details