महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

JEE Main Exam 2023: जेईई मेन परीक्षा 24 जानेवारीपासून होणार, एनएटीएकडून अधिसूचना जारी - १३ भाषांमध्ये होणार

JEE Main Exam 2023: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जेईई मेन परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. एनटीएच्या म्हणण्यानुसार, यंदा परीक्षा २ सत्रांमध्ये होणार आहे. पहिल्या सत्राची परीक्षा २४ जानेवारीपासून होणार आहे. परीक्षा 13 भाषांमध्ये असणार आहे.

JEE Main Exam 2023
JEE Main Exam 2023

By

Published : Dec 16, 2022, 9:26 AM IST

नवी दिल्ली: अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा JEE-Main ही प्रजासत्ताक दिन वगळता 24 ते 31 जानेवारी दरम्यान होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) गुरुवारी याची घोषणा केली आहे. दुसऱ्या सत्राची परीक्षा एप्रिलमध्ये होणार आहे. 15 डिसेंबर ते 12 जानेवारी या कालावधीत परीक्षेसाठी अर्ज सादर करता येतील.

एनटीएच्या वरिष्ठ संचालक साधना पाराशर म्हणाले की, 'शैक्षणिक सत्र 2023-24 साठी, JEE (मुख्य)-2023 दोन सत्रांमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिले सत्र जानेवारी 2023 आणि दुसरे सत्र एप्रिल 2023 असणार आहे.

ही परीक्षा इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, पंजाबी, ओडिया, तमिळ, तेलगू आणि उर्दू अशा १३ भाषांमध्ये होणार आहे. पाराशर म्हणाले की, 'जेईई (मुख्य) 2023 च्या पहिल्या सत्रात फक्त पहिले सत्र दिसेल आणि उमेदवार त्यातून निवडू शकतात. पुढील सत्रात फक्त दुसरे सत्र दिसेल आणि उमेदवार ते निवडू शकणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार दुसऱ्या सत्रासाठी अर्जाची संकेतस्थळ पुन्हा उघडणार आहे, आणि त्यासाठी स्वतंत्र अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे.

JEE-Main हे NITs, IITs आणि इतर केंद्रीय अर्थसहाय्यित तंत्रज्ञान संस्था आणि इतर सहभागी राज्य सरकारांनी अनुदानित किंवा मान्यताप्राप्त संस्थांमध्ये पदवीपूर्व अभियांत्रिकी कार्यक्रमांच्या प्रवेशासाठी आयोजित केले जाते. ही JEE Advanced साठी पात्रता परीक्षा देखील आहे जी IIT मध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतली जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details