महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

JEE Main Result : जेईई मेनच्या पहिल्या सत्राचा निकाल जाहीर, महाराष्ट्राचा दिव्यांश शिंदे देशात प्रथम

एनटीएने जेईई मेन 2023 सत्र 1 चा निकाल जाहीर केला आहे. ही परिक्षा 24 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2023 दरम्यान घेण्यात आली होती. या परीक्षेत चंद्रपूरचा दिव्यांश शिंदे देशात प्रथम आला आहे. तो ५ वर्षांपासून कोटामध्ये तयारी करत होता.

JEE Main
जेईई मेन्स

By

Published : Feb 7, 2023, 7:07 AM IST

Updated : Feb 7, 2023, 11:35 AM IST

नवी दिल्ली :जेईई मेन 2023 सत्र 1 चा निकाल अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर घोषित करण्यात आला आहे. या परिक्षेसाठी बसलेले उमेदवार आता आपला निकाल डाउनलोड करू शकतात. जेईई मुख्य पेपर 2 चे निकाल लवकरच अधिकृत साइटवर जाहीर केले जातील. उमेदवार त्यांचा अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि सुरक्षा पिन टाकून परिक्षेचा निकाल डाउनलोड करू शकतात.

निकाल कसा डाउनलोड करावा :(1) अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in ला भेट द्या. (2) त्यानंतर जेईई मेन 2023 च्या निकालासाठी लिंकवर क्लिक करा. (3) तुमचा तपशील एंटर करा आणि सबमिट वर क्लिक करा. (4) जेईई मेन 2023 चा निकाल स्क्रीनवर दिसेल. (5) निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील गरजांसाठी निकालाची प्रिंट आउट काढून ठेवा. जेईई मेन 2023 सत्र 2 ची नोंदणी 7 फेब्रुवारी 2023 पासून सुरू होईल.

परिक्षेचे दुसरे सत्र एप्रिलमध्ये : यावर्षी एनटीएने घोषित केले आहे की जेईई मेन्स प्रवेश परीक्षा दोन सत्रांमध्ये घेतली जाईल. या अंतर्गत पहिले सत्र जानेवारीत पूर्ण झाले आहे. जेईई मेन्स पहिल्या सत्राची परिक्षा 24 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2023 या दरम्यान घेण्यात आली होती. ज्याचा निकाल आज लागला आहे. आता जेईई मेन्सच्या दुसऱ्या सत्राची नोंदणी jeemain.nta.nic.in या वेबसाइट वर सुरू होईल. दुसऱ्या सत्राची परिक्षा 6 ते 12 एप्रिल दरम्यान घेतली जाणार आहे. या परिक्षेला दरवर्षी सुमारे 10 लाख विद्यार्थी बसतात.

75 टक्के गुणांची सक्ती : आयआयटी आणि एनआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी 12 वी मध्ये बोर्डाच्या परिक्षेत 75 टक्के गुणांची सक्ती पुन्हा लागू करण्यात आली आहे. दरवर्षी एनटीए आयआयटी आणि एनआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी जेईई मेन्स परीक्षा घेतली जाते. आता यंदाच्या जेईई परिक्षेत पुन्हा एकदा 12 वी मध्ये 75 टक्के गुणांची सक्ती लागू करण्यात आली आहे. मागील ३ वर्षांपासून कोविड-१९ मुळे हा पात्रता नियम काढून टाकण्यात आला होता. या नियमा अंतर्गत 12 वीत सामान्य, EWS आणि OBC साठी 75 टक्के गुण आणि SC-ST साठी 65 टक्के गुणांची पात्रता लागू होती.

हेही वाचा :Agniveer Recruitment Process : अग्निवीर भरती प्रक्रियेत महत्त्वाचे बदल, आता प्रथम ऑनलाइन परीक्षा द्यावी लागणार

Last Updated : Feb 7, 2023, 11:35 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details