महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

JEE Advanced 2022 Result : जेईई अ‍ॅडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर, आर के शिशिर देशभरात प्रथम - तनिष्का काबरा महिलांमध्ये अव्वल

आज जेईई अ‍ॅडव्हान्स्डसाठी पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर ( JEE Advanced 2022 Result Declare ) झाला. बॉम्बे झोनच्या आर के शिशिरने IIT प्रवेश परीक्षेत जेईई अ‍ॅडव्हान्स्डमध्ये अव्वल क्रमांक पटकावला ( R K Shishir rank first ) आहे. ज्याचा निकाल आज रविवारी जाहीर करण्यात आला.

JEE Advanced
जेईई अ‍ॅडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल

By

Published : Sep 11, 2022, 12:21 PM IST

नवी दिल्ली - आज जेईई अ‍ॅडव्हान्स्डसाठी पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर ( JEE Advanced 2022 Result Declare ) झाला. बॉम्बे झोनच्या आर के शिशिरने IIT प्रवेश परीक्षेत जेईई अ‍ॅडव्हान्स्डमध्ये अव्वल क्रमांक पटकावला ( R K Shishir rank first ) आहे. ज्याचा निकाल आज रविवारी जाहीर करण्यात आला.

आर के शिशिरने प्रथम - आयआयटी बॉम्बेने दिलेल्या माहितीनुसार, शिशिरने 360 पैकी 314 गुण मिळवले आहेत. तर दिल्ली विभागातील तनिष्का काबरा हिने 277 गुणांसह महिलांमध्ये अव्वल स्थान पटकावले ( Tanishka Kabra tops in the women list ) आहे. तिची ऑल इंडिया रँक 16 आहे. 1.5 लाखांहून अधिक उमेदवार परीक्षेला बसले होते. यात 40,000 हून अधिक उमेदवार पात्र ठरले आहेत.

तनिष्का काबरा महिलांमध्ये अव्वल - यात एकूण गुण गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रात मिळालेल्या गुणांची बेरीज करून मोजले जातात. उमेदवारांना रँक लिस्टमध्ये समाविष्ट करण्यासाठी एकूण पात्रता गुणांची पूर्तता करावी लागते. असे आयआयटी बॉम्बेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. जेईई-मेन, जी देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी प्रवेश परीक्षा आहे. त्यात ही जेईई अ‍ॅडव्हान्स्डसाठी पात्रता परीक्षा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details