नवी दिल्ली -इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थांच्या (IITs) प्रवेशाचे निकष आणि जॉईन्ट एन्ट्रन्स एक्झामिनेशन (JEE) परीक्षेची तारीख केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ७ जानेवारीला जाहीर करणार आहेत. ७ तारखेला सायंकाळी ६ वाजता तारखा जाहीर करणार असल्याची माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली.
JEE परीक्षेची तारीख आणि IIT प्रवेश प्रक्रिया ७ जानेवारीला जाहीर होणार - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थांच्या (IITs) प्रवेशाचे निकष आणि जॉईन्ट एन्ट्रन्स एक्झामिनेशन (JEE) परीक्षेची तारीख केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ७ जानेवारीला जाहीर करणार आहेत.
अभियांत्रिकी महाविद्यालयये आणि देशातील २३ आयआयटीतील प्रवेशासाठी जेईई अॅडव्हान्स परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. ही परीक्षा देण्यासाठी परीक्षा मंडाळाने घालून दिलेल्या सर्व निकषांची पूर्तता विद्यार्थ्यांना करावी लागते. १२ वी ची परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना जेईईची परीक्षा देता येते. मात्र, आता जेईई अॅडव्हान्स देण्यासाठी जेईई मेन्स परीक्षा पात्र असावे लागणार आहे.
जेईई अॅडव्हॉन्सची परीक्षा सलग दोन वर्ष फक्त दोनदा देता येते. परीक्षा पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट आयआयटीमध्ये प्रवेश मिळतो. 'जॉईन्ट सिट अॅलोकेशन अॅथॉरिटीद्वारे' विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो.