शिमला- उत्तराखंड, गुजरातनंतर हिमाचल प्रदेशचा मुख्यमंत्री भाजपकडून बदलण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कारण, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. दीड वर्षानंतर ठाकूर हे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत.
मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांची देहबोली अत्यंत आत्मविश्वासपूर्ण दिसून येत आहे. मात्र, राजकीय अफवामध्ये केवळ विरोधी पक्षच नव्हे तर सत्ताधारी पक्षातील गटही सहभागी झाले आहेत. विरोधी पक्षांकडून अफवा पसरविली जात असताना जयराम ठाकूर यांनी दिल्लीमध्ये विरोधी पक्षनेत्यांवर टीका केली.
हेही वाचा-सणासुदीतील बॉम्बस्फोटाचा उधळला डाव; 6 दहशतवाद्यांना दिल्लीत अटक
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर म्हणाले, की विरोधी पक्षाकडून माझ्या दिल्लीत दौऱ्याचे बारकाईने परीक्षण सुरू असल्याचे पाहून चांगले वाटले. मागील वेळी राष्ट्रपतींना निमंत्रण देण्यासाठी आलो होतो. हिमाचल प्रदेशमधील महत्त्वाच्या प्रकल्पांवर काही केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. यावेळी संघटनेची बैठक आहे. ही बैठक यापूर्वीच निश्चित करण्यात आली होती. उद्या (15 सप्टेंबर 2021) हिमाचल प्रदेशात परतणार आहे. तर दुसऱ्या दिवशी राष्ट्रपतींचे शिमल्यामध्ये स्वागत करणार आहे.
हेही वाचा-राजा महेंद्र प्रताप सिंह विद्यापीठाची पायाभरणी: पंतप्रधानांनी सांगितली बालपणीची 'ही' खास आठवण
जयराम ठाकूर यांना पर्याय म्हणून अनुराग ठाकूर, जे. पी. नड्डा तर इंदु गोस्वामी यांच्याकडे पाहिले जाते. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. जे. पी. नड्डा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सक्रिय आहेत. त्यामुळे ते हिमाचल प्रदेशमध्ये परतण्याची शक्यता नाही. अनुराग ठाकूर यांनीदेखील केंद्रीय मंत्रिमंडळात आपले स्थान निर्माण केले आहे. भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी वेळोवेळी हिमाचल सरकारचे कौतुक केले आहे. स्थानिक वादात हायकमांडकडे तक्रारी केल्या जातात. मात्र, त्याकडे हायकंमाड गांभीर्याने पाहत नाहीत.
हेही वाचा-मोदी सरकामध्ये दम असेल तर तालिबानींना दहशतवादी घोषित करावे-असदुद्दीन ओवैसी