मुंबई: श्रीलंकेचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सनथ जयसूर्याने बीसीसीआय सचिव जय शाह यांची भेट घेतली ( Sanath Jayasuriya meets BCCI Secretary Jay Shah ) आहे. खुद्द सनथने ट्विट करून या भेटीची माहिती दिली आहे. श्रीलंकेला सध्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळेच 2022 च्या आशिया कपचे यजमानपद गमवावे लागले. जयसूर्याने सांगितले की त्यांनी या भेटीत जय शाह यांच्याशी श्रीलंका क्रिकेटशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा ( Discussion on sri lankan cricket ) केली. यानंतर बीसीसीआय श्रीलंकेला मदत करण्यासाठी काही मोठे पाऊल उचलू शकते, अशी अटकळ बांधली जात आहे.
श्रीलंकेतील आर्थिक संकट ( Economic crisis in Sri Lanka ) आणि राजकीय पेचप्रसंगाच्या काळात सनथ जयसूर्या एक आवाज म्हणून उदयास आला. रविवारी झालेल्या बैठकीनंतर सनथ जयसूर्याने ट्विट केले आणि म्हटले की, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांना भेटून सन्मान आणि आनंद झाला. जयसूर्या पुढे म्हणाला, इतक्या कमी वेळात आम्हाला भेटण्यास सहमती दिल्याबद्दल धन्यवाद. श्रीलंकेतील क्रिकेटबाबत आम्ही काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली.