महानुभाव धर्मीयांच्या श्रद्धेनुसार त्यांना ईश्वरांच्या पंचावतारांपैकी पाचवा अवतार Ishwaranchaya fifth incarnation मानले जाते. लीळाचरित्र या मराठीतील पहिल्या चरित्रग्रंथाचे ते नायक म्हणून इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात गुजराथमधील भडोच येथे शके ११४२ विक्रम संवत्सर भाद्रपद महिन्याच्या शुक्लपक्षाच्या रविवारी सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचा अवतार झाला. त्यांचे वडील विशाळदेव हे भडोचचा राजा मल्लदेव याचे प्रधान होते. त्यांच्या आईचे नाव म्हाळईसा होते. सर्वज्ञ श्री चक्रधरांचे जन्म नाव हरपाळदेव असे होते. तारुण्यात आल्यावर हरपाळदेव यांचा विवाह कमळाईसा यांच्याबरोबर झाला. याच काळात त्यांनी युद्धांतही पराक्रम गाजवला. वैदिक परंपरेला नाकारून सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणारे चक्रधर स्वामी हे महाराष्ट्रातील पहिले ज्ञात समाज सुधारक First known social reformer होते. चक्रधर स्वामीची आज आहे जयंती Jayanti Of Chakradhar Swami त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा थोडक्या आढावा पाहूयात.
बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात चक्रधर स्वामी यांचा जन्मचक्रधर स्वामी यांच्या प्रारंभिक जीवनासंबंधीची Chakradhar Swami Early Life माहिती लीळाचरित्राच्या या ग्रंथाच्या एकांक या भागात पाहायला मिळते. बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात गुजराथमधील भडोच येथे चक्रधर स्वामी यांचा जन्म झाला. त्यांचे वडील विशाळदेव हे भडोचचा राजा मल्लदेव याचे प्रधान होते. त्यांच्या आईचे नाव म्हाळईसा होते. चक्रधरांचे पाळण्यातील नाव हरपाळदेव असे होते.युवा झाल्यावर हरपाळदेव यांचा विवाह कमळाईसा यांच्याबरोबर झाला. याच काळात त्यांनी युद्धांतही पराक्रम गाजवला. पुढे हरपाळदेवांना आजारी लोकांची सेवा करायचा छंद जडला. ते राजवाडा सोडून आजारी लोकांबरोबर वेळ घालवू लागले. कालांतराने त्यांची प्रकृती अचानक खालवली व त्यांचा मृत्यू झाला. परंतु सरणावर ठेवल्यावर हरपाळदेव जिवंत असल्याचे आढळून आले. महानुभावीयांच्या श्रद्धेनुसार यावेळी श्रीकृष्णाने त्यांच्या शरीरात प्रवेश करून अवतार धारण केला. महानुभावीयांच्या पंच अवतारातील तिसरा अवतार श्री चांगदेव यांचा त्याच सुमारास मृत्यू झाला होता. त्यामुळे त्याचा आत्मा चक्रधर स्वामी यांच्या शरीरात शिरल्याचा एक मतप्रवाह आहे.
समाज व धर्म सुधारणा भ्रमंतीच्या काळात चक्रधर यांची मेहकर येथे बाणेश्वराच्या मंदिरात बोणेबाईंची भेट झाली. बोणेबाईंना देवकी व स्वत श्रीकृष्ण बनवून त्यांनी मेहकर येथे गोकुळाष्टमी साजरी केली. बोणेबाईंबरोबर त्यांनी लोणारची यात्राही केली. सिंहस्थ यात्रेनिमित्ताने ते त्र्यंबकेश्वरला जाण्यास निघाले. वाटेत पैठण येथे त्यांनी त्र्यंबकेश्वरास जाण्याचा बेत रद्द करून पैठण येथेच विधिवत संन्यासाची दीक्षा घेतली. यानंतरच्या काळात त्यांनी प्रकटपणे समाज व धर्मसुधारणेचे त्यांचे कार्य सुरू केले. एकाकी भ्रमणाच्या काळात चक्रधरांनी लोकजीवन प्रत्यक्ष पाहिले. त्या काळातील सामाजिक व धार्मिक परिस्थितीचे अवलोकन केले. त्यांच्या पुढील ज्ञानदानाच्या कार्याची पूर्वतयारीच या काळात झाली, असे सांगितले जाते.