नवी दिल्ली:जावेद अख्तर यांनी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यावरून पाकिस्तानला चांगलेच खडेबोल सुनावले. पाकिस्तानात लाहोरमध्ये आयोजित केलेल्या फैज महोत्सवात सहभागी होण्यासाठी गेलेल्या अख्तर यांनी मुंबई दहशतवादी हल्ला आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादावर टीका केली. मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी हल्ला करणारे हे नॉर्वे किंवा दुसऱ्या देशातून आले नव्हते, अशी आठवण करून देत अख्तर यांनी सवाल उपस्थित केला.
जीएनएन यूट्यूब चॅनलने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, जावेद अख्तर म्हणत आहेत की, वास्तविकता अशी आहे की जर आपण दोघांनी (भारत आणि पाकिस्तान) एकमेकांवर आरोप केले नाहीत तर काही फरक पडणार नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही देशांमध्ये जे गरम वातावरण आहे ते कमी झाले पाहिजे. आम्ही तर बॉम्बेचे लोक आहेत. तिथे हल्ला कसा झाला ते आम्ही पाहिले आहे. ते लॉग नॉर्वेतून आलेले नाहीत, इजिप्तमधून आलेले नाहीत, ते लोक अजूनही तुमच्या देशात मोकळे फिरत आहेत. आता या गोष्टीचा आमच्या लोकांना राग येणारच ना? असे अख्तर म्हणाले.
सोशल मीडियावर अख्तर यांचं कौतुक:पाकिस्तानी भूमीवर पाकिस्तानातून उगम पावलेल्या दहशतवादाला फटकार मारल्याबद्दल नेटिझन्सकडून अख्तर यांचे कौतुक केले जात आहे. एका ट्विटर वापरकर्त्याने लिहिले, प्रत्यक्ष आणि स्पष्ट, चांगले केले @Javedakhtarjadu, तर दुसऱ्या ट्विटर वापरकर्त्याने लिहिले, @Javedakhtarjadu साहेब धनुष्य घ्या. जावेद अख्तर यांच्या या विधानानंतर आता अख्तर यांचे चांगलेच कौतुक होत आहे.