नवी दिल्ली : खाद्यपदार्थांच्या बाबतीत भारत नेहमीच अव्वल राहिला आहे. विविध पाककृतींचा आस्वाद घेणाऱ्यांसाठी भारत हे एक अतिशय आकर्षक ठिकाण आहे. दरम्यान जपानचे भारतातील राजदूत हिरोशी सुझुकी आपल्या पत्नीसोबत पुण्यात जेवणाचा आस्वाद घेताना दिसले. याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लक्ष वेधले गेले. जपानचे राजदूत सुझुकी यांनी आपल्या पत्नीसह पुण्यातील मिसळ, वडापाववर ताव मारत असून त्यांनी तो व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी ज्याप्रकारे व्हिडिओ शेअर केला त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी खूश झाले आहेत. यानंतर मोदींनी भारतातील खाद्य वैविध्य नाविन्यपूर्ण पद्धतीने मांडण्याच्या राजदूताच्या पुढाकाराचे कौतुक केले.
व्हिडिओ केला शेअर : सुझुकीने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते आपल्या पत्नीसह पुण्यात जेवणाचा आस्वाद घेत आहेत. “मला भारताचे स्ट्रीट फूड आवडते, पण थोडे कमी तिखट, असा कॅप्शन त्यांनी या व्हिडिओला दिले आहे. शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये त्यांची पत्नी मसालेदार निवडते तर सुझुकी कमी मसालेदार अन्न निवडते. सुझुकीने ट्विटरवर आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ते 'मिसळ पाव' चा आस्वाद घेताना दिसत आहे. त्यांच्या पत्नीनेही मिसळ पावचा आस्वाद घेतला दोघेही मिसळ मागवतात. पण सुझुकीने यांच्य पत्नी कोल्हापूर मसालेदार 'मिसळ पाव' निवडते. यावर सुझुकीने यांनी व्हिडिओसोबत लिहिले की, माझ्या पत्नीने माझा पराभव केला.