ग्वाल्हेर ग्वाल्हेरच्या फुलबागमध्ये असलेल्या सिंधियाच्या 100 वर्ष जुन्या मंदिरात Radha Krishna Temple Gwalior, उपस्थित असलेल्या राधाकृष्णाच्या मूर्तींना जन्माष्टमीनिमित्त विशेष दागिन्यांनी सजवण्यात adorned ornaments येत आहे. मूर्तींना रत्नजडित दागिन्यांनी सजवले जात आहेत. हे दागिने प्राचीन आहेत आणि त्यांची किंमत 100 worth 100 crores jewellery कोटींहून अधिक आहे. हिरे, मोती, पाचू यांसारख्या मौल्यवान रत्नांनी सजलेले मुकुट आणि इतर दागिने expensive makeup in the world आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी देवाला या दागिन्यांनी सजवले जायचे. मात्र देश स्वतंत्र झाल्यापासून हे दागिने बँकेच्या लॉकरमध्ये कैद होते. 2007 मध्ये हे मंदीर महापालिकेच्या देखरेखीखाली आले आणि तेव्हापासून प्रत्येक जन्माष्टमीला राधा कृष्णाच्या मूर्तींना या मौल्यवान दागिन्यांमध्ये सजवले जाते. जन्माष्टमीच्या दिवशी हे दागिने बँकेच्या लाॅकर मधुन काढले जातात. दरम्यान प्रचंड गोपनीयता व सुरक्षा पाळली जाते.
राधारानी आणि नंदलाल कोणते विशेष दागिने घालतील फुलबाग येथील गोपाल मंदिराची स्थापना, ग्वाल्हेर संस्थानाचे तत्कालीन शासक माधवराव प्रथम यांनी 1921 मध्ये केली होती. त्यांनी देवपूजेसाठी चांदीची भांडी आणि रत्नांनी जडवलेले सोन्याचे दागिने बनवले होते. त्यामध्ये राधाकृष्णासाठी ५५ पाने आणि सात तारांचा हार, सोन्याची बासरी, सोन्याची नथ, साखळी आणि चांदीची भांडी आहेत. जन्माष्टमीच्या दिवशी राधाकृष्णाला या दागिन्यांनी सजवले जाते. यावेळीही राधा कृष्ण २४ तास या अलंकारांनी सजणार असून, हे रूप पाहण्यासाठी भक्त वर्षभर प्रतीक्षा करतात. त्यामुळे दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. यामध्ये परदेशी भाविकांचाही समावेश आहे.