हैदराबादJanmashtami 2023 : श्री कृष्ण जन्माष्टमीला हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे स्थान आहे. या दिवशी लोक उपवास भगवान श्रीकृष्णाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतात. यावेळी बुधवारी, 6 सप्टेंबर 2023 रोजी जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे. यावर्षी जन्माष्टमीच्या मुहूर्तावर अनेक वर्षांनी असा योगायोग घडला आहे जो फार दुर्मीळ आहे. श्रीमद् भागवत पुराणानुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपद कृष्ण अष्टमी तिथी, बुधवारी, रोहिणी नक्षत्र आणि वृषभ राशीच्या मध्यरात्री झाला होता.
रोहिणी नक्षत्र कधी असणार ? पंचागानुसार रोहिणी नक्षत्र 6 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 9:21 वाजता सुरू होईल आणि 7 सप्टेंबर रोजी सकाळी 10:25 वाजता समाप्त होईल. त्यामुळे यंदा कृष्ण जन्मोत्सव ६ सप्टेंबरला रात्री साजरा केला जाणार असून ६ तारखेलाच जन्माष्टमी उपवास केला जाणार आहे. तर वैष्णव पंथाचे लोक ७ सप्टेंबर रोजी जन्माष्टमी साजरी करतील.
रोहिणी नक्षत्र :
- रोहिणी नक्षत्र प्रारंभ - 06 सप्टेंबर 2023, सकाळी 09:20
- रोहिणी नक्षत्र अंत- 07 सप्टेंबर २०२३, सकाळी 10:25
जन्माष्टमी तारीख :
- भाद्रपद कृष्ण जन्माष्टमीची तारीख - 06 सप्टेंबर 2023, दुपारी 03.37 वाजता
- भाद्रपद कृष्ण अष्टमी तिथी समाप्त - ०७ सप्टेंबर २०२३, दुपारी ०४.१४
पूजा मुहूर्त :
- श्री कृष्ण पूजेची वेळ - 6 सप्टेंबर 2023, दुपारी 12.00 -12:48
- पूजेचा कालावधी – ४८ मिनिटे
जन्माष्टमी शुभ मुहूर्त :जन्माष्टमीची तारीख बुधवार 6 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 3.37 वाजता सुरू होईल आणि 7 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 4.14 वाजता संपेल. तर जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त 12.02 ते 12.48 पर्यंत असेल. या मुहूर्तावर पूजा केली जाते. नियमानुसार पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. पुराणानुसार रोहिणी नक्षत्रात रात्री १२ वाजता श्रीकृष्णाचा जन्म झाला. या श्रद्धेनुसार 6 सप्टेंबर रोजी त्यांची जयंती साजरी करतील. या दिवशी रोहिणी नक्षत्राचाही योगायोग तयार होत आहे.
हेही वाचा :
- Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनाला 200 वर्षांनंतर घडणार अद्भुत योगायोग; गुरू शनीच्या कृपेने या 3 राशी असतील धनवान
- Sawan Putrada Ekadashi २०२३ : पुत्रदा एकादशीची आज कशी करावी पूजा? जाणून घ्या महत्त्व आणि शुभ मुहूर्त
- Gayatri Jayanti 2023 : काय आहे गायत्री जयंती ? जाणून घ्या तिथी, महत्त्व आणिपूजाविधी...