Uttar Pradesh Election 2022 : जेडीयूने जाहीर केली वीस उमेदवारांची यादी - जनता दल यूनाइटेड
जनता दल यूनाइटेड (Janata Dal (United)) ने आज (25 जानेवारी) उत्तर प्रदेश विधानसभेच्या 20 जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार जेडीयूने लखनऊच्या कैंट विधानसभा मतदारसंघासाठी ( Lucknow Cantt Vidhan Sabha Seat ) आशीष सक्सेना यांचे नाव घोषित केले आहे.
जेडीयू
By
Published : Jan 25, 2022, 7:36 PM IST
|
Updated : Jan 26, 2022, 4:12 AM IST
लखनऊ (उत्तर प्रदेश) -जनता दल (यूनाइटेड)ने ( Janata Dal United Candidate List ) मंगळवारी (दि. 25 जानेवारी) उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ( Uttar Pradesh Election 2022 ) 20 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. लखनऊच्या कैंट विधानसभा मतदारसंघासाठी ( Lucknow Cantt Vidhan Sabha Seat ) आशीष सक्सेना यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशात जनता दल यूनाइटेडचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनूप पटेल यांनी व्यक्त केला.
जेडीयूचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनूप पटेल यांनी यंदाच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ( Uttar Pradesh Election 2022 ) 26 जागांवर लढवण्याची घोषणा केली होती. त्यातील वीस जागांवरील उमेदवारांची घोषणा केली असून उर्वरित नावे पटेल लवकरच घोषित करणार आहेत.
दरम्यान, मालेगाव बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी रमेशचंद्र उपाध्याय यांना तिकीट देण्याचे प्रकरण तापले असताना जनता दल युनायटेडने सुधारित यादी जारी करून रमेशचंद्र उपाध्याय यांची विधानसभेची जागा काढून घेतली. त्यांच्या जागी मीरा दिवाकर यांना पक्षाच्या उमेदवारी देण्यात आली आहे.
जनता दल यूनाइटेड ( Janata Dal United )ने जाहीर केलेल्या उमेदवारांची यादी खालील प्रमाणे :