जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा बाहेरून कामासाठी आलेल्या मजुरांवर दहशतवादी हल्ला झाला आहे. शोपियांच्या हरमेनमध्ये दहशतवाद्यांनी मजुरांवर ग्रेनेड हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात २ मजुरांचा मृत्यू झाला आहे. मृत मनीष कुमार (40) आणि राम सागर हे उत्तर प्रदेशातील कन्नौजचे रहिवासी होते. २ महिन्यांपूर्वी काश्मीरला कामानिमित्त गेले होते.
Terrorist Attack : शोपियानमध्ये ग्रेनेड हल्ला; युपीतील २ मजुरांचा मृत्यू - युपीतील २ मजुरांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा बाहेरून कामासाठी आलेल्या मजुरांवर दहशतवादी हल्ला झाला आहे. शोपियांच्या हरमेनमध्ये दहशतवाद्यांनी मजुरांवर ग्रेनेड हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात २ मजुरांचा मृत्यू झाला आहे. मृत मनीष कुमार (40) आणि राम सागर हे उत्तर प्रदेशातील कन्नौजचे रहिवासी होते. २ महिन्यांपूर्वी काश्मीरला कामानिमित्त गेले होते.
टार्गेट किलिंगची ही दुसरी घटना : दहशतवाद्यांनी 5 मजुरांवर ग्रेनेड फेकले. पोलिसांनी लष्कर-ए-तैयबाच्या एका संकरित दहशतवाद्याला अटक केली आहे. इम्रान बशीर गनी असे त्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी सोमवारी हा हल्ला केला जेव्हा सर्व कामगार आपापल्या घरात झोपले होते. लेफ्टनंट गव्हर्नर आज शोपियानला येणार होते. त्यांच्या भेटीपूर्वी दहशतवाद्यांनी ही घटना घडवून आणली.गेल्या तीन दिवसांत शोपियानमध्ये टार्गेट किलिंगची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी शोपियानमध्ये काश्मीरचे पंडित पूरण कृष्ण भट्ट यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.
पुलवामा येथे SIU चा छापा :जम्मू-काश्मीरचे आयजीपी विजय कुमार म्हणाले की, आतापर्यंत 2 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच्या उल्लेख केलेल्या ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. लवकरच मुख्य आरोपींना अटक करण्यात येईल. दुसरीकडे, पुलवामामध्ये स्पेशल इन्व्हेस्टिगेटिव्ह युनिटचे (SIU) छापे देखील सुरू आहेत. परिसराची पूर्णपणे नाकेबंदी करण्यात आली आहे. ३० किलो आयईडीच्या संदर्भात ऑगस्टमध्ये छापा टाकण्यात आला होता. या प्रकरणी यापूर्वीही अनेकांना अटक करण्यात आली आहे.