रियासी ( जम्मू-काश्मिर ) - लश्कर-ए-तोयबा ( Lashkar e Taiba ) च्या दोन दहशतवाद्यांना जम्मू काश्मिरच्या रियासी गावात तिथल्या स्थानिकांनी पकडले. त्यानंतर, त्या दहशतवाद्यांना पोलिसांच्या ताब्यात ( Militant Handed Over To Police ) दिले गेले आहे. त्यांच्या जवळ हत्यारे आढळून आली. ती हत्यारेही पोलिसांना देण्यात आली ( Weapons Handed Over To Police ) आहेत. रविवारी रियासी जिल्ह्यात ही घटना घडली.
लश्कर-ए-तैयबाचे कमांडर राजौरी जिल्ह्यातले रहिवासी तालिब हुसैन आणि नुकताच झालेला आईईडी विस्फोटा ( IED Blasts ) मागचे मास्टरमाइंड तसच दक्षिण कश्मीरच्या पुलवामा ( Pulwama ) जिल्ह्यातले आतंकवादी फैजल अहमद डर यांचा समावेश आहे. त्यांना रियासीमधल्या तुकसान गावातून पकडण्यात आले. त्यांच्याकडून 2 रायफल ( Rifles ), 7 ग्रेनेड ( Grenades) आणि एक पिस्तूल ( Pistol )जप्त करण्यात आले आहे. अशी माहिती अधिकार्यांनी दिली. गावकऱ्यांनी दाखवलेल्या शौर्याबद्दल पोलीस महासंचालक दिलबाग सिंग ( Director General of Police Dilbag Singh ) यांनी गावकऱ्यांना 2 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.