श्रीनगर Muslim Girl Sing Ram Bhajan : जम्मू-काश्मीरच्या उरीमध्ये राहणाऱ्या एका मुस्लिम तरुणीनं पहाडी भाषेत गायलेल्या राम भजनाची सर्वत्र चर्चा होत आहे. अयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी तिचं हे गाणं वेगानं व्हायरल होतंय. रामललाचा अभिषेक सोहळा 22 जानेवारीला अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिरात होणार आहे.
राम भजनानं प्रेरित : सय्यद बतूल झेहरा असं या 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचं नाव आहे. ती गायक जुबिन नौटियाल यानं गायलेल्या राम भजनानं प्रेरित झाली होती. झेहरानं सांगितलं की, जुबिन नौटियाल यांचं हिंदीतील राम भजन ऐकून तिला त्याची पहाडी आवृत्ती तयार करण्यास प्रेरित केलं. "मी यूट्यूबवर जुबिन नौटियाल यांनी गायलेलं हिंदी भजन ऐकलं. मी पहिल्यांदा ते हिंदीत गायलं आणि मला ते खूप छान वाटलं. यानंतर मी माझ्या पहाडी भाषेत गाण्याचा विचार केला. मी हे चार ओळींचं भजन भाषांतरित केलं आणि ते गायलं. यानंतर त्याला इंटरनेटवर अपलोड केलं", असं ती म्हणाली.