संयुक्त राष्ट्रसंघ : भारताने पुन्हा एकदा जम्मू आणि काश्मीर भारताचाच असल्याची ठामपणे भूमिका संयुक्त राष्ट्रसंघाच्या पातळीवर मांडली आहे. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य आणि पूर्णत: भाग असल्याचे भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातील कायमस्वरुपी सदस्य टी. एस. त्रिमुर्ती यांनी सांगितले. स्थितीत काय बदल करायचा असेलत पाकव्याप्त काश्मीर रिकामा करण्याची गरज असल्याचे त्रिमुर्ती यांनी सांगितलवे. ते ऑगस्ट महिन्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत.
भारत हा 2021-22 या वर्षाकरिता संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेचा अस्थायी सदस्य आहे. परिषदेचे अध्यक्षपद हे रोटेशन पद्धतीने ऑगस्टकरिता भारताला मिळाले आहे. संयुक्त राष्ट्रसंघातील कायमस्वरुपी सदस्य तथा राजदूत टी. एस. त्रिमुर्ती यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की भारत सागरी सुरक्षा, दहशवादाचा बिमोड आणि शांतता अशा विविध महत्त्वाच्या संकल्पनांवर कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे.
हेही वाचा-भारत-चीनमधील कॉर्पस कंमाडर पातळीवरील चर्चा विधायक
जम्मू आणि काश्मीर प्रदेशाबाबत असलेले प्रश्न हे भारताच्या अंतर्गत बाबी
भारताने जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा असलेले 370 कलम रद्द केले आहे. त्याबाबत टी. एस. त्रिमुर्ती म्हणाले, की सुरुवातीपासून तुम्हाला स्पष्ट करतो, काश्मीर हा भारताचा अविभाज्य आणि पूर्ण भाग आहे. मला वाटते, ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जम्मू आणि काश्मीर प्रदेशाबाबत असलेले प्रश्न हे भारताच्या अंतर्गत बाबी आहेत. सुरक्षा परिषदेच्या सर्व सदस्यांनी त्याबाबत संमती दर्शविली आहे. हा विषय परिषदेत चर्चा करण्याची गरज नाही.