श्रीनगर - लष्कर तोयबाशी संबंधित असलेले तीन दहशतवादी सुरक्षा दलाच्या कारवाईत ( three killed terrorists in Pulwama ) शनिवारी ठार झाले आहेत. यामध्ये शहीद रियाझ अहमद यांची हत्या करणाऱ्या जुनैद शीरगोजरी ( Pulwama linked with LeT ) या दहशतवाद्याचा समावेश असल्याचे काश्मीरचे आयजीपी विजय कुमार ( IGP Kashmir Vijay Kumar ) यांनी सांगितले. चोवीस तासांत दक्षिण काश्मीरमधील ही दुसरी चकमक होती.
पुलवामाच्या द्राबगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक ( Encounter between security forces and terrorists ) झाली आहे. या चकमकी दरम्यान सुरक्षा दलाने तीन दहशतवादी ठार केले आहेत. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील द्राबगाम भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू ( terrorist killed in Pulwama ) झाली होती. खांदेपोरा कुलगाममध्ये चकमक झाली. यामध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा एक दहशतवादी ( Hizbul Mujahideen terrorist ) मारला गेला.
चोवीस तासांत दक्षिण काश्मीरमधील ही दुसरी चकमक होती. खांदेपोरा कुलगाममध्ये चकमक झाली. यामध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा एक दहशतवादी ( Hizbul Mujahideen terrorist ) मारला गेला. शनिवारी सकाळी उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमधील पुतखा भागात सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यासाठी दहशतवाद्यांनी आयईडी टाकला होता. मात्र सतर्क सुरक्षा कर्मचाऱ्यांना दहशतवाद्यांच्या या कारवाईची माहिती आधीच लागली. यावर त्यांनी तातडीने रस्त्यावर पडलेला आयईडी शोधून काढला आणि नंतर बॉम्ब निकामी पथकाला माहिती दिल्यानंतर तो निष्क्रिय करण्यात आला.