महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

JK Elections Voter : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; जम्मूमध्ये इतर राज्यातील लोकही मतदान करू शकणार - Deputy Commissioner of Jammu

नॅशनल कॉन्फरन्सने म्हटले आहे की, केंद्रातील मोदी सरकार जम्मू-काश्मीरच्या ( Jammu Kashmir) मतदार यादीत ( Elections Voter List ) २५ लाख नवीन मतदारांचा समावेश करण्याची कसरत करत आहे. जारी केलेल्या निवेदनात एनसीने म्हटले आहे की सरकार 25 लाख गैर-स्थानिक लोकांना मतदार यादीचा भाग बनवणार आहे.

Jammu Kashmir Elections Voter
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

By

Published : Oct 12, 2022, 2:03 PM IST

श्रीनगर : जम्मूच्या ( Jammu Kashmir ) उपायुक्त अवनी लवासा ( Avni Lavasa Deputy Commissioner of Jammu ) यांनी मंगळवारी एक मोठी घोषणा केली. जम्मूमध्ये एक वर्षाहून अधिक काळ राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची नवीन मतदार म्हणून ( Elections Voter List ) नोंदणी करावी, असे आदेश त्यांनी दिले.त्यांच्या निर्णयानंतर जर बाहेरचा कोणीही जम्मूमध्ये एक वर्षापेक्षा जास्त काळ राहिला तर त्याला मतदानाचा अधिकार मिळेल.

यादीत नवीन मतदारांचा समावेश :त्याचबरोबर या निर्णयानंतर जम्मू-काश्मीरच्या राजकारणात भूकंप झाला आहे. या आदेशावर तेथील राजकीय पक्ष आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. याला नॅशनल कॉन्फरन्सने कडाडून विरोध केला आहे. नॅशनल कॉन्फरन्सने नाराजी व्यक्त करताना सांगितले की, केंद्रातील मोदी सरकार जम्मू-काश्मीरच्या मतदार यादीत २५ लाख नवीन मतदारांचा समावेश करण्याचा प्रयत्न करत आहे. जारी केलेल्या निवेदनात एनसीने म्हटले आहे की सरकार 25 लाख गैर-स्थानिक लोकांना मतदार यादीचा भाग बनवणार आहे. या निर्णयाला आमचा विरोध आहे. भाजपला निवडणुकीची भीती वाटते, त्याचा पराभव होणार आहे, हे त्यांना माहीत आहे. भाजपचा हा डाव जनतेने मतपेटीतून हाणून पाडावा आहे.

निवडणुकेचे दिले होते संकेत :जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू झाली आहे. नुकतेच गृहमंत्री अमित शहा यांनीही जम्मूचा दौरा केला होता, त्यांनीही दौरात लवकरच निवडणुका होणार असल्याचे संकेत दिले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details