श्रीनगर Road Accident In Kashmir : बस दरीत कोसळून 36 प्रवाशांचा मृत्यू झाल्यानं मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना जम्मू काश्मीरच्या दोडा जिल्ह्यातील आसेर परिसरात घडली आहे. 55 प्रवाशांना घेऊन जाणारी ही बस आसेर परिसरातील खोल दरीत कोसळली आहे. रोडवरुन घसरुन ही बस खोल दरीत कोसळल्याची माहिती जम्मूचे विभागीय आयुक्त रमेश कुमार यांनी दिली आहे.
बटोटे-किश्तवार राष्ट्रीय महामार्गावरील त्रंगल-आसेरजवळ बसचा भीषण अपघात झाला आहे. 55 प्रवाशांना घेऊन जाणारी बस 300 फूट दरीत कोसळली आहे. अपघात झाल्याची माहिती मिळताच प्रशासनाकडून बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. २५ प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. - रमेश कुमार, विभागीय आयुक्त, जम्मू
तीनशे फूट खोल दरीत कोसळली बस : जम्मू काश्मीरच्या दोडा जिल्ह्यात बुधवारी सकाळी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. बाटोटे किश्तवाड राष्ट्रीय महामार्गावरुन बस ( क्रमांक JK02, CN 6555 ) ही तृंगाल आसार परिसरातून जात होती. यावेळी चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं बस तीनशे फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या बसमधील 36 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बसमधील 25 प्रवाशांचा मृत्यू : दोडा जिल्ह्यात झालेल्या बस अपघातात तब्बल 36 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी धाव घेतली. अपघातस्थळावर स्थानिक नागरिकांनी बचावकार्याला सुरुवात केली. मात्र खोल दरीत बस कोसळल्यानं बचावकार्यात अडथळे आले. तीनशे फूट खोल बस दरीत कोसळल्यानं बसमधील 36 प्रवाशांचा मृत्यू झाला असून आणखी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.