महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Two Terrorist Arrested: बारामुल्ला येथे दोन दहशतवाद्यांना अटक - दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश

जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे लष्कर, पोलीस आणि एसएसबीच्या संयुक्त पथकांनी एका दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवादी साथीदारांना जेरबंद करण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे.

Two Terrorist  Arrested
दोन दहशतवाद्यांना अटक

By

Published : Apr 11, 2023, 9:50 AM IST

बारामुल्ला: अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांविरोधात पट्टण पोलिस ठाण्यात शस्त्रास्त्र आणि बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंध) कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी सोमवारी याबाबत माहिती दिली. लष्कर-ए-तैयबा (एलईटी) संघटनेच्या दोन दहशतवादी साथीदारांना शस्त्रास्त्र आणि दारूगोळ्यासह अटक केले आहे. गुप्त माहितीच्या आधारे, फारुख अहमद पारा आणि सायमा बशीर अशी दहशतवादी साथीदारांची ओळख पटली आहे.

पिस्तूल केली जप्त: बारामुल्ला पोलीस, आर्मी 29 आरआर आणि 2 बीएन एसएसबीचे जवान या ऑपरेशनमध्ये सहभागी होते. सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकांनी बारामुल्ला पट्टण येथून दोन दहशतवादी साथीदारांना अटक केली. त्यांच्याकडून एक पिस्तूल, दोन पिस्तुल मॅगझिन, पिस्तूल राउंड-पाच इम्प्रोव्हायझ्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस आणि रिमोट कंट्रोल्ड इम्प्रोव्हायझ्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस सुमारे 2 किलो वजनाचे उपकरण जप्त करण्यात आले.

दहशतवादी साथीदारांचीही चौकशी: अटक केलेल्या दहशतवादी सहकाऱ्यांनी चौकशीदरम्यान सांगितले की, ते सक्रिय दहशतवादी आहेत. आबिद कयूम लोन याच्यासोबत दहशतवादी सहकारी म्हणून काम करत होते. याशिवाय, पट्टण पोलिस ठाण्यात शस्त्रास्त्र आणि बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवादी साथीदारांचीही चौकशी केली जात आहे. दोघांच्या चौकशीत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता असल्याचे सुरक्षा दलाचे म्हणणे आहे.

दोन दहशदवाद्यांना अटक: याआधीही अशीच एक घटना घडली होती. उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील झानपुरा-खदनियार भागातील एका चेक पोस्टवर सैन्य आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईदरम्यान, टिआरएफ संघटनेशी संबंधित दोन दहशदवाद्यांना अटक करण्यात आली होते. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्तियाज अहमद आणि मुनीर अहमद अशी त्यांची नावे असून त्यांच्या ताब्यातून 40 राऊंड दारूगोळा जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

चार दहशतवाद्यांना यापूर्वीही अटक :हरविंदरसिंघ रिंदा या कुख्यात बब्बर खालसा या संघटनेतील चार दहशतवाद्यांना मे, 2022 मध्ये अटक करण्यात आली. हरयाणातील कर्नाल येथे पोलिसांनी स्फोटकासह पकडलेले चारही दहशतवादी मार्च महिन्यात चार दिवस नांदेड मुक्कामी होते. त्यानंतर बिदरमार्गे गोव्याला गेले होते. कुख्यात हरविंदरसिंघ रिंदाचे हे चार दहशतवादी साथीदार आहेत. पाकिस्तानमधून आलेला शस्त्रसाठा ते नांदेडला आणणार होते. त्यानंतर आता हैदराबाद, बिदर, गोवा, नांदेड भागाची रेकी केल्याची माहिती पुढे येत आहे. ही माहिती पुढे आल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.

हेही वाचा: Amritpal Singh अमृतपालचा साथीदार पापलप्रीत याला दिल्लीतून अटक

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details