जम्मू-काश्मीर - जम्मू-काश्मीर पोलिसांनी शनिवारी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित एका दहशतवाद्याला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला व्यक्ती त्राल येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला व्यक्ती सुरक्षा दलांवर हल्ला करण्याच्या जैशच्या योजनेनुसार आला होता. त्याचा तो प्लान होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
बिलाल अहमद या आणखी एका व्यक्तीची ओळख पटली - "त्राल येथील रहिवासी असलेल्या शफीक अहमद शेखला अटक करण्यात आली आहे. त्याला जैशने (दहशतवादी संघटनेने) जम्मूमध्ये येण्याची सूचना दिली होती. त्याला दोन दहशतवाद्यांना त्याच्या घरी ठेवायचे होते. ते त्याच्या घराजवळील सुरक्षा दलाच्या छावणीवर हल्ला करणार होते. जम्मू झोनचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) मुकेश सिंग यांनी माध्यमांना सांगितले. "बिलाल अहमद या आणखी एका व्यक्तीची ओळख पटली आहे, जो सांबा परिसरातून दहशतवाद्यांना उचलून शफीक अहमद शेख यांच्याकडे आणणार होता. सुरक्षा दलाच्या छावणीवर हल्ला करण्यापूर्वी ते एका चकमकीत मारला गेला होता.