श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये एक मिनी बस दरीत कोसळल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अऩेक जण जखमी झाल्याची माहिती असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली असून वेगाने मदतकार्य सुरू आहे. रुग्णवाहिकेतून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमीचा निश्चित आकडा अद्याप हाती आलेला नाही. जम्मू-काश्मीरमधील दोडा येथे थाथरीजवळ ही घटना घडली.
जम्मू काश्मीरमध्ये बस दरीत कोसळल्याने 8 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींकडून मदत जाहीर - केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह
जम्मू-काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात एक मिनी बस दरीत कोसळल्याने 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अऩेक जण जखमी झाल्याची माहिती असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

चिनाब नदीच्या पात्राजवळ चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे वृत्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरमध्ये घडलेल्या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. 'ही घटना अत्यंत दुख:त आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. या अपघातात जखमी झालेल्यांना लवकरात-लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो', असे टि्वट मोदींनी केले. मृतांच्या कुटुंबीयांना मोदींनी PMNRF अंतर्गत दोन लाखांची तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
हेही वाचा -जम्मू-काश्मीरमध्ये मिनी बस दरीत कोसळून ११ विद्यार्थ्यांचा मृत्यू