महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

संपावर असलेल्या काश्मिरी हिंदू कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्याचे जम्मू-काश्मीर प्रशासनाचे आदेश - जम्मू काश्मीर प्रशासनाचे वेतन रोखण्याचे आदेश

जम्मू-काश्मीर: काश्मीर खोऱ्यात काम करणाऱ्या पंतप्रधान पॅकेज कर्मचाऱ्यांबाबत कठोर भूमिका घेत कामगार विभागाने विभागातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना या पॅकेज कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर महिन्याचे वेतन थांबवण्याचे स्थायी आदेश जारी केले आहेत.

फाईल फोटो
फाईल फोटो

By

Published : Sep 22, 2022, 9:29 PM IST

श्रीनगर - दहशतवाद्यांकडून अल्पसंख्याकांच्या हत्येदरम्यान काश्मिरी हिंदू कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या मागणीसाठी खोऱ्यात अनेक महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. दरम्यान, अशा कामगारांचे पगार रोखण्याचे आदेश जम्मू-काश्मीर प्रशासनाने दिले आहेत. काश्मीरचा कामगार विभाग आणि अतिरिक्त उपायुक्त, अनंतनाग यांनी बुधवारी (दि. 21 सप्टेंबर)रोजी खोऱ्यात संपावर गेलेल्या काश्मिरी हिंदू कर्मचाऱ्यांचे पगार रोखण्याचे आदेश जारी केले आहेत.

उप-कामगार आयुक्त (DLC), काश्मीर अहमद हुसेन भट यांनी आपल्या आदेशात खोऱ्यातील सर्व सहाय्यक कामगार आयुक्तांना सप्टेंबर महिन्याचे संपावर असलेल्या कामगारांचे वेतन रोखण्याचे निर्देश दिले आहेत. भट म्हणाले की, सप्टेंबर महिन्यात गैरहजर राहिलेल्या पंतप्रधान पॅकेज अंतर्गत भरती झालेल्या अशा संपकरी कर्मचाऱ्यांना सप्टेंबर (2022) महिन्याचा पगार दिला जाऊ नये असे आदेश दिले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details