महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बॉलीवुड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची ईडीकडून सलग पाच तास चौकशी - कॉनमॅन सुकेश चंद्रशेखर

गेल्या काही दिवसांपासून ईडीकडून कॉनमॅन सुकेश चंद्रशेखर याची मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी सुरू होती. या प्रकरणात जॅकलीन फर्नांडीसचे नाव समोर आल्याची चर्चा आहे.

जॅकलीन फर्नांडिस
जॅकलीन फर्नांडिस

By

Published : Aug 30, 2021, 6:41 PM IST

हैदराबाद- बॉलीवुड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हे अडचणीत सापडली आहे. सक्त अंमलबजावणी संचालनालयाने (ED) बॉलीवुड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची (Jacqueline Fernandez) गेल्या पाच तासांपासून दिल्लीमध्ये चौकशी करत आहे.

गेल्या काही दिवसांपासून ईडीकडून कॉनमॅन सुकेश चंद्रशेखर याची मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी सुरू होती. या प्रकरणात जॅकलीन फर्नांडीसचे नाव समोर आल्याची चर्चा आहे.

सध्या, अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ही आगामी भूत पुलिस सिनेमामुळे चर्चेत आहे. भूत पुलिसमध्ये अभिनेता सैफ अली खान आणि अर्जून कपूर हे प्रमुख भूमिकेत आहेत.

हेही वाचा-ई़डीने त्यांचा एक अधिकारी भाजपाच्या कार्यालयात ठेवलाय का? - संजय राऊत

ईडीने फिल्म 'उरी- द सर्जिकल स्ट्राइक'ची अभिनेत्री यामी गौतमची (Yami Gautam) मनी लाँड्रिंग प्रकरणात 7 जुलैला चौकशी केली होती.

दरम्यान, शिवसेना खासदार भावना गवळी व महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर नुकतेच ईडीने कारवाई केली आहे. बॉलीवुड अभिनेत्रीची ईडीकडून चौकशी होत असल्याने ईडीने मनोरंजन क्षेत्राकडे मोर्चा वळविल्याचे दिसत आहे.

हेही वाचा-ईडीच्या कारवाईवर खासदार भावना गवळी म्हणाल्या, हा तर जुलमीपणा...

ABOUT THE AUTHOR

...view details