श्रीनगर (जम्मू-काश्मीर) : जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी जम्मू-काश्मीरमध्ये विकास होण्याच्या अनुषंगाने कला आणि मनोरंजन क्षेत्रावर प्रकाश टाकला आहे. श्रीनगरमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करताना सिन्हा म्हणाले, छोट्या शहरांमध्येही ३० वर्षांनंतर सिनेमागृह सुरू होत आहेत. काही दिवसांपूर्वी बारामुल्लामध्ये एक सिनेमागृह सुरू झाले होते. आता सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात, बांदीपोरा, गांदरबल आणि कुलगाम जिल्ह्यांमध्ये सिनेमागृह लोकांना समर्पित केले जातील, असे ते मंगळवारी सायंकाळी म्हणाले आहेत. श्रीनगर येथील टागोर हॉलमधील अमृत युवा कलोत्सवात मंत्रमुग्ध झालेल्या प्रेक्षकांना एलजी सक्सेना यांनी संबोधित केले. देशभरातील कलाकार त्यांचे कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी आणि विविध कला शिकण्यासाठी काश्मीरमध्ये येत आहेत, याविषयी त्यांनी आनंद व्यक्त केला.
कला शांततेच्या भूमीतच फुलते :शेजारील देश आणि काही लोकांच्या इकोसिस्टमने गेल्या अनेक वर्षांपासून जम्मू-काश्मीरमधील लाखो लोकांची स्वप्ने आणि आकांक्षा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. पण, जम्मू-कश्मीरमधील नागरिक, तरुणांना नवी स्वप्ने पडत आहेत. नवीन वातावरण निर्माण करण्यात मदत होत आहे. प्रत्येकाने हे लक्षात ठेवले पाहिजे की, कला शांततेच्या भूमीतच फुलते. जिथे शांतता नसते, तिथे कला विकसित होणार नाही. गेल्या चार वर्षांत जम्मू-कश्मीरने या क्षेत्रात नवीन उंची गाठली आहे. कोविड महामारीच्या काळात कलाकारांना खूप त्रास सहन करावा लागला आहे, परंतु आता, आमचे कलाकार जम्मू-काश्मीरचे हरवलेले वैभव परत आणण्यासाठी नवीन उर्जेने काम करत आहेत, असे मनोज सिन्हा म्हणाले.