महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उत्तराखंडमधील हिमस्खलनानंतर काश्मिरातही नैसर्गिक आपत्तीचा धोका - नैसर्गिक आपत्ती जोशीमठ

सतत वाढणाऱ्या आद्यौगिकरणामुळे, जंगल कटाईमुळे काश्मिरातील हिमनद्याही वेगाने वितळत आहेत. काश्मिराताली सोनमर्ग भागातील थाजिवास ही हिमनदीही धोकादायक बनली असून सरकारने याकडे तत्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी तज्ज्ञांकडून होत आहे.

FILE PIC
संग्रहित छायाचित्र

By

Published : Feb 12, 2021, 7:07 AM IST

श्रीनगर - जगभरात जम्मू काश्मीर नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. काश्मिरला 'स्वित्झर्लंड ऑफ एशिया' असेही म्हटले जाते. नैसर्गिक सौंदर्याने नटलेले डोंगर, दऱ्या खोरे, हिमनद्या, जंगले यांच्यावरह आता हवामान बदलाचा परिणाम होऊ लागला आहे. नुकतेच उत्तराखंडमध्ये हिमस्खलन होऊन मोठी दुर्घटना घडली. त्यामुळे हवामान बदलाच्या परिणामांकडे गांभिर्याने पाहण्याची वेळ आली आहे.

काश्मिरातील हिमनद्या वेगाने वितळत आहेत -

सतत वाढणाऱ्या आद्यौगिकरणामुळे, जंगल कटाईमुळे काश्मिरातील हिमनद्याही वेगाने वितळत आहेत. काश्मिराताली सोनमर्ग भागातील थाजिवास ही हिमनदीही धोकादायक बनली असून सरकारने याकडे तत्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी तज्ज्ञांकडून होत आहे.

थाजिवास हिमनदी होतेय लहान -

थाजिवास हिमनदी मागील ३ वर्षात सुमारे ५० मीटरने कमी झाल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. जर यावर तत्काळ उपाययोजना केल्या नाहीत तर स्थानिक नागरिकांना धोका होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काश्मीर विद्यापीठातील भूगर्भशास्त्र माहिती विभागाचे प्राध्यापक डॉ. इर्फान रशीद यांनी ईटीव्ही भारतशी चर्चा केली. यावेळी ते म्हणाले की, काश्मिरातील अनेक हिमनद्या वितळत आहेत. जर आपण १९४८ आणि आता काढलेल्या छायाचित्रांत तुलना केली तर हिमनद्या धोकादायक पद्धतीने वितळत असल्याचे दिसून येईल. हिमनदी फुटली तर परिसरातील नागरिकांना विध्वंसाला सामोरे जावे लागेल, असे ते म्हणाले. जम्मू काश्मीरमध्ये सुमारे ३०० हिमनद्या आहेत. हिमनद्या वितळण्यामुळे पाणी, अन्न आणि उर्जेची साखळी बिघडेल. याचा गंभीर परिणाम स्थानिकांवर होईल, त्यामुळे याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, असा सूर तज्ज्ञांमधून उमटत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details