श्रीनगर -जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असून आज (मंगळवार) दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. दुसऱ्या टप्प्यातील जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीत ४८.६२ टक्के मतदान झाले. निवडणुकीचे आणखी सहा टप्पे बाकी आहेत.
जम्मू विभागात ६५.५४ टक्के मतदान पार पडले तर काश्मीर विभागात ३३.३४ टक्के मतदान झाले. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त के. के शर्मा यांनी मतदान पार पडल्यानंतर पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली. जम्मू काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यात 51.76 टक्के मतदान झाले आहे. मागील वर्षी काश्मीरची स्वायत्तता काढून घेतल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. काश्मीरची स्वायत्तता पुन्हा माघारी घेण्याचे आश्वासन देवून राज्यातील स्थानिक पक्ष निवडणुका लढत आहेत. तर काश्मीरचा विकास करण्याचे आश्वासन भाजपने दिले मतदारांना दिले आहे.
आठ टप्प्यात होणार मतदान