श्रीनगर -हुर्रियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष मीरवाइज उमर फारुख यांच्या सुटकेच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. शुक्रवारी जामिया मशिदीत सामूहिक प्रार्थनेनंतर हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व 'अंजुमन औकाफ जामा मशिद'च्या सदस्यांनी केले.
मीरवाइज उमर फारुख 5 ऑगस्ट पासून नजरकैदेत
मीरवाइज उमर फारुख हे कलम 370 रद्द केल्यानंतर 5 ऑगस्टपासून नजरकैदेत आहेत. अंजुमनच्या प्रवक्त्याने सांगितले की, कार्यकर्त्यांनी आज मीरवाइजच्या सुटकेची मागणी केली. फलक आणि बॅनर लावून शांततेत निदर्शने केली.