संबलपूर : IT raid in Odisha दोन कंपन्यांच्या कथित करचुकवेगिरीच्या संदर्भात छापे मारताना आयकर विभागानं 300 कोटींहून अधिक रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. एवढी रक्कम पाहून प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांवरदेखील थक्क होण्याची वेळ आली. अनेक दारू कंपन्यांनी मिळकत कर चुकवल्याच्या आरोपावरून बुधवारी राज्याच्या विविध भागात आयकर विभागाकडून छापे टाकण्यात आले.
- पश्चिम ओडिशातील सर्वात मोठ्या देशी दारू निर्मिती आणि विक्री कंपन्यांपैकी एक असलेल्या बलदेव साहू अँड ग्रुप ऑफ कंपनीजच्या बालंगीर कार्यालयावर छापा मारताना 150 कोटींहून अधिक रोख जप्त करण्यात आले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संबलपूर कॉर्पोरेट कार्यालयात छापेमारी करताना 150 कोटींहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे.
दारूच्या डिस्टिलरीवर छापा : प्राथमिक माहितीनुसार बौद्ध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची भागीदारी फर्मवर आयकर विभागानं छापे टाकले होते. बुधवारी आयकर पथकाने सुंदरगढमधील मद्य व्यावसायिक राजकिशोर प्रसाद जैस्वाल यांच्या सरगीपली येथील घर, कार्यालय आणि देशी दारूच्या डिस्टिलरीवर छापा टाकला होता. पलासपल्ली येथील बौद्ध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेडचे कॉर्पोरेट कार्यालय आणि काही अधिकाऱ्यांच्या घरांवरही छापे टाकण्यात आले.