महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Pegasus spyware जर खरेदी केले असल्यास त्याची केंद्रीय आयटी मंत्र्यांनी माहिती द्यावी - चिदंबरम - P Chidambaram on Pegasus spyware

पी. चिदंबरम यांनी एकामागून एक ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली आहे. सरकारने पेगासस सॉफ्टवेअर अथवा स्पायवेअर खरेदी केले आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

P Chidambaram on Pegasus spyware
P Chidambaram on Pegasus spyware

By

Published : Jul 20, 2021, 1:42 AM IST

नवी दिल्ली - काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी पेगासस स्पायवेयरवरून केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर निशाणा साधला. जर सरकारने पेगासस स्पाइवेयर खरेदी केले असल्यास त्याची केंद्रीय आयटी मंत्र्यांनी माहिती द्यावी, अशी मागणी चिदंबरम यांनी केली आहे.

पी. चिदंबरम यांनी एकामागून एक ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की पेगाससची मालकी असलेल्या एनएसओ ग्रुपच्या माहितीनुसार कंपनी तंत्रज्ञान केवळ कायदेशीर अंमलबजावणी संस्था आणि सरकारी गुप्तचर संस्थांना देण्यात येते. दुर्दैवाने आयटी मंत्री वैष्णव यांनी चुकीच्या पावलावर पाऊल ठेवत कारकीर्द सुरू केली आहे. मंत्र्यांनी सोप्या प्रश्नाचे उत्तर द्यायला हवे. सरकारने पेगासस सॉफ्टवेअर अथवा स्पायवेअर खरेदी केले आहे का?

संबंधित बातमी -Pegasus Snooping : अमित शाहांनी राजीनामा देण्याची काँग्रेसची मागणी; वाचा, काय आहे प्रकरण?वाचा-

काय म्हणाले होते केंद्रीय आयटी मंत्री?

  • पेगासस सॉफ्टवेअरच्या मदतीने राजकीय नेते, पत्रकार आणि इतरांची हेरगिरी झाल्याचे दावे केंद्रीय आयटी मंत्री वैष्णव यांनी लोकसभेत सपशेलपणे फेटाळून लावले आहेत. देशातील कायदे पाहता बेकायदेशीर देखरेख शक्य नसल्याचेही केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले.
  • लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी पेगाससचे माध्यमातील रिपोर्ट हा योगायोग असू शकत नाही. या खळबळजनक दाव्यांत कोणताही पुरावा नाही.
  • १८ जुलै २०२१ रोजी माध्यमातील रिपोर्ट हे भारतीय लोकशाही आणि चांगल्या प्रस्थापित संस्थांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न दिसत आहे, असेही आयटी मंत्री लोकसभेत म्हणाले. दरम्यान, भारत सरकारने पेगासस सॉफ्टवेअरचा वापर केला की नाही, याबाबत त्यांनी स्पष्ट माहिती दिली नाही.

काँग्रेसने पेगासस प्रकरणी स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच तत्काळ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे.

संबंधित बातमी वाचा-Pegasus Spyware : काय आहे पेगासस स्पाइवेयर अन् कसे करते हेरगिरी, भारताच्या राजकारणात वादळ

ABOUT THE AUTHOR

...view details