लखनौ (उत्तर प्रदेश) : हिंदू देवतांच्या मूर्तींची उपस्थिती ( Hindu dieties idols in Taj Mahal ) तपासण्यासाठी ताजमहालमधील 22 बंद दरवाजे ( Open closed doors in Taj Mahal ) उघडावेत. दरवाजे उघडून त्याची तपासणी करण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात दाखल करण्यात आली ( Plea filed in High court on Taj Mahal ) आहे.
या याचिकेत तथ्य शोध समितीची स्थापना आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) कडून अहवाल सादर करण्याची मागणी करण्यात आली आहे. याचिकेत म्हटले आहे की, हिंदू देवतांच्या मूर्ती बंद दरवाजाआड बंदिस्त आहेत. या याचिकेत काही इतिहासकार आणि काही हिंदू गटांनी हे स्मारक जुने शिवमंदिर असल्याच्या दाव्यांचाही उल्लेख केला आहे.
"काही हिंदू गट आणि प्रतिष्ठित संत हे स्मारक जुने शिवमंदिर असल्याचा दावा अनेक इतिहासकारांनी केले आहेत आणि वस्तुस्थितीही आहे. परंतु अनेक इतिहासकार याला मुघल सम्राट शाहजहानने बांधलेला ताजमहाल मानतात. काही लोकांचा असाही विश्वास आहे की, तेजो महालय हाच ताजमहाल एक आहे. ज्योतिर्लिंग म्हणजेच उत्कृष्ठ शिव मंदिर असल्याचा दावाही त्यात करण्यात आला आहे.
"हे आदरपूर्वक सादर केले जाते की, चार मजली इमारतीच्या वरच्या आणि खालच्या भागात (अंदाजे २२ खोल्या) काही खोल्या आहेत. ज्या कायमस्वरूपी बंद आहेत आणि पी एन ओक सारख्या अनेक इतिहासकार आणि करोडो हिंदू उपासकांचा असा ठाम विश्वास आहे की त्यामागे मंदिर आहे. भगवान शिव तेथे उपस्थित आहेत," असेही याचिकेत म्हटले आहे.
ताजमहालमधील दरवाजे बंद करण्यामागील कारणाबाबत ASI कडे दाखल केलेल्या आरटीआयचा हवाला देऊन, "भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग, आग्रा यांनी दिलेल्या उत्तरात असे म्हटले आहे की, सुरक्षेच्या कारणास्तव ते दरवाजे बंद ( ASI probe on Taj Mahal closed doors ) आहेत."
भारतीय जनता पक्ष (भाजप) अयोध्या जिल्ह्याचे मीडिया प्रभारी, डॉ रजनीश सिंह यांनी याचिका दाखल केली आहे जी अद्याप सुनावणीसाठी आली नाही. "2020 पासून, मी ताजमहालच्या बंद खोल्यांबद्दल तथ्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. मी एक आरटीआय दाखल केला होता. आरटीआयला उत्तर देताना, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने केंद्रीय माहिती आयोगाला (दिल्लीमध्ये) कळवले की, या खोल्या लॉक झाल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव आणि या खोल्यांबद्दल तपशील दिलेला नाही," असे ते म्हणाले. सिंग म्हणाले, "आरटीआयमध्ये, मी बंद खोल्यांबद्दल तपशील (त्यांच्या आत काय आहे) आणि त्या उघडण्याचे निर्देश मागितले होते,".
हेही वाचा : ताजमहाल हे 'शिवमंदिर', नाव बदलून 'राममहल' ठेवणार; सुरेंद्र सिंह यांचे वादग्रस्त विधान