बेंगळुरू : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने रविवारी चांद्रयान - 3 ने कॅप्चर केलेला चंद्राचा पहिला व्हिडिओ जारी केला. स्पेस एजन्सीने ट्विटरवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये चंद्र निळसर - हिरव्या रंगात दिसतो आहे.
23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचे उद्दिष्ट : हे अंतराळयान आणखी काही दिवस चंद्राभोवती फिरत राहणार आहे. त्यानंतर ते चंद्राच्या 100-किमी वर्तुळाकार कक्षेत पोहचेल. ते चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श करण्यापूर्वी चंद्राच्या कक्षेत स्वतःला स्थापित करणार आहे. 17 ऑगस्ट रोजी इस्रो लँडिंग मॉड्यूलला प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे करेल. लँडिंग मॉड्यूल, विक्रम, रोव्हर प्रज्ञान वाहून नेतो. त्यानंतर 23 ऑगस्ट रोजी विक्रमचे चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षितपणे उतरण्याचे उद्दिष्ट आहे. ऑपरेशनचा हा भाग महत्वाचा आहे, कारण तो लँडिंग मॉड्यूलला स्वतंत्रपणे नेव्हिगेट करण्यास आणि चंद्रावर अचूक लँडिंग करण्यास जबाबदार आहे.
चंद्राविषयीची आपली समज वाढविण्यात मदत होईल : यशस्वी सॉफ्ट लँडिंगनंतर सुमारे चार तासांनंतर, रोव्हर प्रज्ञान लँडर विक्रमपासून वेगळे होणार आहे. त्यानंतर विक्रम आणि प्रज्ञान दोघेही चंद्राच्या पृष्ठभागावर सिटू प्रयोग करतील. इन-सीटू प्रयोग म्हणजे पृथ्वीवर नमुने परत न आणता थेट चंद्राच्या पृष्ठभागावर केल्या जाणार्या चाचण्या आणि विश्लेषणे. हे प्रयोग चंद्राचे वातावरण, रचना आणि इतर वैज्ञानिक मोजमापांशी संबंधित मौल्यवान डेटा आणि अंतर्दृष्टी प्रदान करतील. यामुळे चंद्राविषयीची आपली समज वाढविण्यात मदत होईल.
सॉफ्ट लँडिंग करणे सर्वात आव्हानात्मक टास्क : चंद्रयान 3 ला चंद्राच्या कक्षेत पोहोचण्यासाठी सुमारे 33 दिवस लागणार आहेत. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर चंद्रयान तेथे केवळ एक दिवस काम करणार आहे. लँडरला चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षितपणे उतरवणे हा मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. इस्रोच्या अनुमानानुसार, 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.47 मिनिटांनी लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करेल. सॉफ्ट लँडिंग करणे हे सर्वात आव्हानात्मक टास्क आहे.
हेही वाचा :
- Chandrayaan 3 Mission:चंद्रयान मोहिमेत मोठे यश, यानाने इस्रोला पाठविला 'हा' महत्त्वाचा संदेश
- Chandrayaan 3 News : इस्रोने चंद्रयान मोहिमेत गाठला मैलाचा दगड, जाणून घ्या सविस्तर
- Chandrayaan 3 Mission : चांद्रयान 3 मोहिमेत महाराष्ट्राचे महत्वपूर्ण योगदान