श्रीहरीकोटा - भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) आंध्र प्रदेशातील सतीश धवन स्पेस स्टेशनवरून पीएसएलव्ही -C 50 या अवकाश यानाचे यशस्वी प्रक्षेपण केले. सीएसएम -०१ या उपग्रहाला पीएसएलव्ही -सी ५० यानाद्वारे अवकाशात सोडण्यात आले. संपर्क व्यवस्था मजबूत करण्यासाठी या उपग्रहाचा फायदा होणार आहे.
इस्रोची ४२ वी मोहिम -
आपत्ती निवारण आणि संपर्क व्यवस्था सुधारण्यासाठी या उपग्रहाचा उपयोग होणार आहे. आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा केंद्रावरून हे प्रक्षेपण करण्यात आले. माहिती प्रसारणासंबंधीचे हे इस्रोची ४२ वी मोहिम आहे. आज (गुरुवार) दुपारी तीन वाजून ४१ मिनिटांनी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. सतीश धवन अंतराळ केंद्र आंध्रप्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यात आहे.
संपर्क व्यवस्थेत सुधारणा होणार -
PSLV-C50 अवकाश यानाद्वारे CMS-01 या उपग्रहावर प्रक्षेपण करण्यात आले. पीएसएलव्ही श्रेणीतील हे ५२ वे मिशन आहे. सतीश धवन अवकाश केंद्रावरील लॉन्च पॅडवरून या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले. या उपग्रहावर सी बँड बसविण्यात आले आहेत. भारत आणि अंदमान निकोबार बेटांचा भाग या उपग्रहाच्या कक्षेत येणार आहे. श्रीहरी कोटा केंद्रावरील आजचे ७७ वे उड्डान आहे.