श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने शुक्रवारी साऊंडींग रॉकेट RH-60 चे यशस्वी प्रक्षेपण केले. न्युट्रल विंड आणि प्लाझ्मा गतिशीलतेतील व्यावहारीक बदलांचा अभ्यास करण्यासाठी या रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले आहे.
ट्विट करून इस्रोची माहिती
इस्रोने ट्विट करून याची माहिती दिली आहे. 'न्युट्रल विंड आणि प्लाझ्मा गतिशीलतेतील बदलांचा अभ्यास करण्यासाठी श्रीहरीकोटा रेंजमधून साऊंडींग रॉकेट RH-60 चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले' असे ट्विट इस्रोने केले आहे. वरच्या वातावरणाचा अभ्यास आणि अंतराळ संशोधनासाठी वापरल्या जाणाऱ्या रॉकेटपैकी हे एक रॉकेट आहे.
पीएसएलव्ही सी-21 चे केले होते प्रक्षेपण
२८ फेब्रुवारी रोजी इस्रोने 2021 मधील पहिली मोहीम राबविताना पीएसएलव्ही सी-51 चे यशस्वी प्रक्षेपण केले होते. या प्रक्षेपणाच्या माध्यतमातून ब्राझीलचा 'अमेझॉनिया-१' आणि तीन भारतीय कृत्रिम उपग्रह इस्रोने अवकाशात पाठविले होते. विशेष म्हणजे, हे सर्व उपग्रह भारतातील नवख्या कंपन्यांनी तयार केले आहेत.