मुंबई :सुमारे ४१ दिवसांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर बुधवारी संध्याकाळी चंद्रयान 3 चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅंडिंग झाले.
भारताने इतिहास रचला : चंद्रयान 2 च्या अयशस्वी प्रयत्नानंतर इस्रोच्या या मोहिमेकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. या मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. चंद्रयान 3 ने 14 जुलै 2023 ला आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून उड्डाण घेतले होते. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीपेक्षा चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती सुमारे सहापट कमी आहे. त्यामुळे चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लॅंडिंग करणे अत्यंत आव्हानात्मक असते. त्यातच इस्रोने यानाला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्याचा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे, तेथे आत्तापर्यंत कोणत्याच देशाचे यान यशस्वीरित्या उतरू शकले नव्हते. रविवारी 20 ऑगस्टला, रशियाचे लुना 25 हे अंतराळयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याच्या प्रयत्नात क्रॅश झाले होते.
शेवटच्या टप्प्यात सर्वकाही ऑटोफेड : यानाच्या लॅंडिगच्या शेवटच्या टप्प्यात सर्वकाही ऑटोफेड असते. लँडरचा वेग नियंत्रित ठेवण्यासाठी त्यात एक रॉकेट बसवले असते. रॉकेट प्रज्वलित झाल्यानंतर, लँडरचा वेग नियंत्रित होतो. याद्वारे लँडरचे सॉफ्ट लँडिंग केले जाते. विशेष म्हणजे, यावेळी ना बुस्टरद्वारे मदत घेता येत, ना यानाची दिशा देखील बदलता येत. लँडिंगचे प्रोग्रामिंगही आधीच केले गेले असते. त्याद्वारे ते आपले काम करते.
शेवटचे 800 मीटर महत्वाचे होते : यानाच्या लॅंडिगसाठी शेवटचे 800 मीटर खूप महत्वाचे होते. 2019 च्या चांद्रयान 2 मोहीमेत चंद्रयान चंद्राच्या 2.1 किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचले होते. मात्र मॉड्यूलमधील समस्येमुळे ते फेल झाले होते. नुकतेच, रशियाचे लुना 25 हे अंतराळयान 20 ऑगस्टला चंद्रावर क्रॅश झाले होते. त्यामुळे भारताच्या या मिशनकडून सर्वांना फार अपेक्षा होत्या. आज त्या आता पूर्ण झाल्या आहेत.
हेही वाचा :
- Chandrayaan 3 च्या लॅंडिंगसाठी अवघे काही तास बाकी, जाणून घ्या आतापर्यंत काय-काय घडलं
- Chandrayaan 3 Live Updates : लॅंडिंगसाठी अवघे काही क्षण बाकी, कैलाश खेर यांनी गायले खास गाणे
- चांद्रयानासाठी शेवटची १५ मिनिटे धोक्याची, जाणून घ्या २०१९ मध्ये काय झाले होते?