जिनेव्हा Israel Palestine Conflict : इस्राईल आणि हमासच्या युद्धात आतापर्यंत हजारो नागरिकांचा बळी गेला आहे. हमासनं हल्ला केल्यानंतर आतापर्यंत 700 इस्राईली नागरिकांचा मृत्यू झाला असून 2 हजार 300 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. इस्राईलनं हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे पॅलेस्टाईन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र या दोन्ही राष्ट्रातील हल्ल्यानंतर हजारो नागरिकांचा बळी गेला असून अनेक जण जखमी झाल्यानं संयुक्त राष्ट्र संघानं मोठी चिंता व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी युद्धात बळी गेलेल्या नागरिकांविषयी चिंता व्यक्त करुन हमासनं केलेल्या घातपाती हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे.
काय म्हणाले संयुक्त राष्ट्र संघाचे सचिव :हमास आणि इस्राईलमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे संयुक्त राष्ट्र संघानं चिंता व्यक्त केली. संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी पॅलेस्टाईन नागरिकांच्या तक्रारीची आपणाला कल्पना आहे. मात्र दहशतवादी कारवाया आणि हत्येचं समर्थन करु शकत नाही. या युद्धामुळे लाखो नागरिकांचा बळी गेला आहे. हजारो नागरिक जखमी झाले असून त्यांना अपंगत्व आलं आहे. त्यामुळे हे हल्ले तत्काळ थांबवण्यात यावेत. नागरिकांना ओलीस ठेवलं आहे, त्यांची तत्काळ सुटका करावी, असं संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी स्पष्ट केलं आहे.
संयुक्त राष्ट्र संघानं व्यक्त केली चिंता :इस्रायल आणि गाझा या दोन्ही देशांतील नागरिकांचा युद्धात बळी गेला आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघानं हमासनं केलेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. हमासनं ओलीस ठेवलेल्या नागरिकांची तत्काळ सुटका करण्याचं संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी यावेळी स्पष्ट केलं. या युद्धात आणखी बळी जाण्याची शक्यताही सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी वर्तवली आहे. न्यूयॉर्कमध्ये माध्यमांना दिलेल्या निवेदनात सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी 1 लाख 37 हजारपेक्षाही अधिक नागरिक बेघर झाली आहेत. या नागरिकांना UNRWA च्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या निर्वासित छावण्यांमध्ये आश्रय घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. तर संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांनी हिंसाचार हा वाद सोडवण्याचा मार्ग नाही, हे शत्रुत्व थाबवण्यात यावं. चर्चेतूनच हा वाद सोडवता येईल, असं त्यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं.