मुंबई - देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी ( Businessman Mukesh Ambani ) यांच्या कुटुंबासाठी २४ डिसेंबर हा आनंदाचा दिवस आहे. या दिवशी मुकेश अंबानी यांची एकुलती एक मुलगी ईशा अंबानी भारतात परतली ( Isha Ambani returned to India ) आहे. वास्तविक, गेल्या महिन्यात जुळ्या मुलांची आई झालेली ईशा एका महिन्यानंतर शुक्रवारी (24 डिसेंबर) मुंबईतील तिच्या माहेरी आली आहे. ईशा आपल्या जुळ्या मुलांसह लॉस एंजेलिस (यूएसए) येथून आली आहे. तिचे दोन्ही भाऊ संपूर्ण सुरक्षा दलासह कलिना विमानतळावर ईशाला घेण्यासाठी गेले होते. ईशा आई झाल्यानंतर प्रथमच संपूर्ण अंबानी कुटुंबात आनंदाची ( happy atmosphere in the Ambani family ) लाट उसळली आहे. अंबानी कुटुंबात ईशा आणि तिच्या जुळ्या मुलांचे जोरदार स्वागत ( Isha Ambani with twins welcome in India ) करण्यात आले आणि आता कुटुंबात सेलिब्रेशनची तयारी सुरू झाली आहे.
ईशा अंबानी कधी झाली आई? - 2018 मध्ये ईशा अंबानीने हिरे व्यापारी अजय पिरामल ( Diamond merchant Ajay Piramal ) यांचा मुलगा आनंद पिरामलसोबत लग्न ( Married to Anand Piramal ) केले. हा एक शाही विवाह होता, ज्यामध्ये जगभरातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. मीडियानुसार मुकेश यांनी मुलगी ईशाच्या लग्नात 700 कोटींहून अधिक खर्च केला होता. लग्नाला चार वर्षांनी 19 नोव्हेंबरला जुळ्या बाळांनी राजेशाही दाम्पत्याचे घर दुमदुमले. ईशा अंबानीने कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिस येथील सेडर सेनेई येथे कृष्णा आणि आदिया या जुळ्या मुलांना जन्म दिला. या दुहेरी आनंदाने संपूर्ण अंबानी कुटुंबावर आनंदाचे वातावरण होते.
कतारहून खास फ्लाइटने आली ईशा अंबानी - मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईशा तिच्या जुळ्या मुलांसह कतार एअरवेजच्या स्पेशल फ्लाइटने मुंबईत आली आहे. मुकेश अंबानी यांचे खास मित्र असलेल्या कतारच्या नेत्याने ते पाठवले होते. ईशाच्या मामाचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ईशाला कलिना एअरपोर्टवरून पूर्ण सुरक्षेसह घरी आणण्यात आले आहे. एवढेच नाही तर लॉस एंजेलिस (अमेरिका) येथून ईशाला आणण्यासाठी खास डॉक्टरांची टीमही गेली होती, जी ईशासोबत भारतात परतली आहे.