हैदराबाद - अब्जाधीश मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा (Mukesh Ambani daughter Isha) आणि जावई आनंद पिरामल यांनी जुळ्या बालकांना जन्म दिला आहे. (Isha Ambani gave birth to twins). मुलीचे नाव आदिया तर मुलाचे नाव कृष्णा असे ठेवण्यात आले आहे. अंबानी कुटुंबाने मीडिया निवेदनात ही बातमी दिली आहे. अंबानी कुटुंबाने निवेदनात म्हटले की, "आम्हाला हे सांगताना आनंद होत आहे की आमची मुलगी ईशा आणि जावई आनंद यांना 19 नोव्हेंबर 2022 रोजी जुळ्या मुलांना जन्म दिला आहे." मुलाचा जन्म कुठे झाला हे निवेदनात सांगितले नसले तरी ही प्रसूती अमेरिकेत झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
Isha Ambani: अंबानींच्या घरी गुड न्यूज, ईशा अंबानीने दिला जुळ्या बाळांना जन्म - Isha Ambani
अंबानी कुटुंबाने मीडिया निवेदनात ही बातमी दिली आहे. मुलाचा जन्म कुठे झाला हे निवेदनात सांगितले नसले तरी ही प्रसूती अमेरिकेत झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. (Isha Ambani gave birth to twins).
![Isha Ambani: अंबानींच्या घरी गुड न्यूज, ईशा अंबानीने दिला जुळ्या बाळांना जन्म Isha Ambani](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16982958-thumbnail-3x2-ambani.jpg)
अंबानी परिवार - मुकेश अंबानींना तीन मुले आहेत. जुळी मुले आकाश आणि ईशा (31 वर्षे) आणि मुलगा अनंत (27 वर्षे). 12 डिसेंबर 2018 रोजी पिरामल ग्रुपचे अजय आणि स्वाती पिरामल यांचा मुलगा आनंद यांच्याशी ईशाचे लग्न झाले होते. दोघेही बालपणीचे मित्र आहेत आणि दोन्ही कुटुंबांमध्येही घट्ट नाते आहे. आकाशने त्याची बालपणीची मैत्रिण श्लोका मेहताशी लग्न केले आहे. श्लोका हिरे व्यापारी रसेल मेहता आणि मोना मेहता यांची मुलगी आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या जोडप्याला पृथ्वी नावाचा मुलगा झाला होता. अनंत लवकरच एन्कोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंटसोबत लग्न करणार असल्याची चर्चा आहे. अंबानींनी त्यांच्या तिन्ही मुलांना त्यांच्या रिलायन्स समूहाशी जोडले आहे. आकाश टेलिकॉम व्यवसाय पाहतो, तर ईशा रिटेल व्यवसायात गुंतलेली आहे. अनंत कडे नवीन ऊर्जेची जबाबदारी आहे. ईशा स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पदवीधर झाली असून, आनंदने हार्वर्ड विद्यापीठातून एमबीए केले आहे. आनंद हे पिरामल या जागतिक व्यापार समूहाचे कार्यकारी संचालक देखील आहेत.