नवी दिल्ली IRCTC Tour Package : नववर्षाचे वेध आता लागले आहेत. या काळात अनेकांना पर्यटनाला जायला आवडतं. याचाच विचार करून आयआरसीटीसीनं (IRCTC) काही खास टूर पॅकेज आणले आहेत.
या ठिकाणी टूर पॅकेज :आयआरसीटीसीने नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ७ ठिकाणांचं टूर पॅकेज आणलं आहे. पॅकेजमध्ये रेल्वेनं प्रवास आणि हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था आहे. अमृतसर, वैष्णो देवी, तीन धाम यात्रा, अंदमान, ओंकारेश्वर, उज्जैन, ऋषिकेश आणि इतर ठिकाणांसाठी हे टूर पॅकेजेस आहेत. आयआरसीटीसीचे जनसंपर्क अधिकारी सिद्धार्थ सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या टूर पॅकेजेस मध्ये लोकं धार्मिक स्थळांना भेट देण्याबरोबरच पर्यटनाचाही आनंद घेऊ शकतात.
- अमृतसर : हे १ रात्र २ दिवसांचं पॅकेज आहे. यामध्ये हॉटेल, जेवण, रेल्वे तिकीट आदी सुविधा देण्यात येतील. या पॅकेजसाठी प्रति व्यक्ती ८,३२५ रुपये शुल्क आकारलं जाईल. यामध्ये पर्यटकांना सुवर्ण मंदिर, जालियनवाला बाग आणि बाघा बॉर्डरला भेट देण्याची सुविधा दिली जात आहे.
- वैष्णो देवी :१ रात्र आणि २ दिवसांचं हे पॅकेज वंदे भारत ट्रेननं दिलं आहे. या पॅकेजसाठी प्रति व्यक्ती ७,२७० रुपये शुल्क आकारलं जाईल. तर ५ ते ११ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ६५५ रुपये शुल्क निश्चित करण्यात आलं आहे. या पॅकेजमध्ये हॉटेल आणि भोजन सुविधांचाही समावेश असेल.
- तीन धाम आणि सहा ज्योतिर्लिंग : हे टूर पॅकेज १५ रात्री आणि १६ दिवसांचं आहे. यामध्ये छ. संभाजीनगर, द्वारका, जगन्नाथ पुरी, मदुराई, नाशिक, रामेश्वरम, सोमनाथ, तिरुपती आणि वाराणसी या पर्यटनस्थळी नेण्यात येईल. ही टूर ५ जानेवारीपासून सुरू होणार आहे. हे पॅकेज ९१,२४० रुपयांपासून सुरू होतं.
- अंदमान : अंदमान टूर पॅकेज ५ रात्री आणि ६ दिवसांचे आहे. यामध्ये पोर्ट ब्लेअर, रोझ आयलंड इत्यादींची सहल केली जाईल. हे टूर पॅकेज १२ डिसेंबर ते १५ जानेवारी पर्यंत आहे. पॅकेजे ७०,९९० रुपयांपासून सुरू होतं.
- उज्जैन महाकालेश्वर : ज्यांना उज्जैन महाकालेश्वरला जायचं आहे, ते हे पॅकेज घेऊ शकतात. ४ रात्री आणि ५ दिवसांचे हे पॅकेज १९ डिसेंबर ते २४ जानेवारीपर्यंत असणार आहे. हे पॅकेज २७,२१० रुपयांपासून सुरू होतं. यामध्ये तुम्ही इंदूर, मांडू, ओंकारेश्वर आणि उज्जैनला भेट देऊ शकता.
- गुजरात टूर : गुजरातची मंदिरं आणि गीर राष्ट्रीय उद्यानाचं टूर पॅकेज ५ रात्री आणि ६ दिवसांचं आहे. ३२,६३० रुपयांच्या या पॅकेजमध्ये तुम्ही द्वारका, पोरबंदर, राजकोट, सासन गिर आणि सोमनाथला भेट देऊ शकता.
- ऋषिकेश : नवीन वर्षात ज्यांना एखाद्या साहसी ठिकाणी जायचं आहे ते हे पॅकेज घेऊ शकतात. हे पॅकेज १ रात्र आणि २ दिवसांचं आहे.